छत्तीसगड : बागेची नासधूस केली म्हणून 'बकरी'ला अटक
By Admin | Updated: February 9, 2016 13:15 IST2016-02-09T13:14:55+5:302016-02-09T13:15:11+5:30
वारंवार बागेत घुसून, झाडांची पानं, भाज्या खाऊन न्यायाधीशांच्या बागेची नासधूस केल्याप्रकरणी छत्तीसगडमध्ये एका 'बकरी'ला अटक करण्यात आली.

छत्तीसगड : बागेची नासधूस केली म्हणून 'बकरी'ला अटक
>ऑनलाइन लोकमत
कोरिआ (छत्तीसगड), दि. ९ - वारंवार बागेत घुसून, झाडांची पानं, भाज्या खाऊन न्यायाधीशांच्या बागेची नासधूस केल्याप्रकरणी छत्तीसगडमध्ये एका 'बकरी'ला अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून सुमारे ३५० किमी अंतरावर असलेल्या कोरिआ जिल्ह्यात हा प्रकार घडला असून याप्रकरणी त्या बकरीचा मालक, अब्दुल हसनलाही अटक करण्यात आली आहे. न्या. हेमंत रात्रे यांच्या शिपायाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
' ही बकरी वारंवार न्या. रात्रे यांच्या बंगल्याचे लोखंडी फाटक ओलांडून बागेत घुसून पानं, झुडपं, भाज्या खाऊन फस्त करत असे. रात्रे यांच्याकडील शिपाईच त्यांच्या बागेची निगा राखतो. बकरीच्या या उपद्रवामुळे त्रासलेल्या त्या शिपायने अनेकवेळा अब्दुल हसनला ताकीद दिली होती, मात्र तरीही बकरी बागेची नासधूस करतच होती. अखेर चिडलेल्या शिपायाने ती बकरी व तिच्या मालकाविरोधात तक्रार नोंदवली आणि आम्ही त्यांना अटक केली ' अशी सहाय्यक पोलीस अधिकारी आर.पी. श्रीवास्तव यांनी दिली.