शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांच्या नाकावर टिच्चून आमदार भीमा मंडवींच्या पत्नीसह कुटुंबीयांनी केले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:54 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपण्यापूर्वी काही वेळ आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील दांतेवाडा परिरसात बॉम्बस्फोट घडवून भाजपा आमदार भीमा मंडवी यांची हत्या केली होती.

रायपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पूर्ण झाले. दरम्यान, पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपण्यापूर्वी काही वेळ आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील दांतेवाडा परिरसात बॉम्बस्फोट घडवून भाजपा आमदार भीमा मंडवी यांची हत्या केली होती. तसेच मतदानावर बहिष्कार घालण्याची धमकी ग्रामस्थांना दिली होती. मात्र आमदार भीमा मंडवींच्या कुटुंबीयांनी घरावर दु:खाचे सावट असतानाही नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता गुरुवारी मतदानाचा हक्क बजावला.छत्तीसगडमधील बस्तर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दांतेवाडामधील श्यामगिरी येथे नक्षलवाद्यांनी मंगळवारी आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करत आयईडी स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात आमदार भीमा मंडवी, त्यांचा वाहनचालक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. भीमा मंडवी यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी आमदार मंडवी यांचे अस्थिविसर्जन करण्यात आले. त्यानंतर भीमा मंडवी यांच्या कुटुंबीयांनी गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भीमा मंडवींचे वडील, पत्नी आणि अन्य कुटुंबीयांनीही मतदान केले. दरम्यान, या मतदान केंद्रावर मंडवी यांचे कुटुंबीयच नव्हे तर अन्य ग्रामस्थांनीही नक्षलवाद्यांच्या धमकीला झुगारून देत मतदानाचा हक्क बजावला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019Votingमतदानnaxaliteनक्षलवादीdemocracyलोकशाही