शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

राजकारण तापलं! "छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सोनिया गांधींचे ATM"; भाजपाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 11:39 IST

Congress Sonia Gandhi : ईडीच्या कारवाईदरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह (Raman Singh) यांनी विधान केलं आहे. ज्यामुळे मोठा वाद आता निर्माण झाला आहे

छत्तीसगडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. ईडीच्या कारवाईदरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह (Raman Singh) यांनी विधान केलं आहे. ज्यामुळे मोठा वाद आता निर्माण झाला आहे. छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांचे ATM आहेत, असं विधान केलं आहे. यावरून भूपेश बघेल (Bhupesh Baghel) संतापले आहेत. 

भूपेश बघेल यांनी रमण सिंह यांना आधी या वक्तव्याचा पुरावा द्या नाहीतर मानहानीचा दावा ठोकतो, असा गंभीर इशारा दिला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. राज्यातील या ईडीच्या छापेमारीवर माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी हे विधान केलं आहे. "सध्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सोनिया गांधींचे एटीएम असल्याचं मी वर्षभरापासून सांगतोय. हा हजारो कोटींचा घोटाळा आहे."

"जमा झालेला पैसा आसाम, त्यानंतर हिमाचल प्रदेशात पाठवला जातो. कलेक्टरला कलेक्शन एजंट बनवलंय. आज त्याच एजंटच्या घरावर ईडी छापेमारी करत आहे" असा आरोप रमण सिंह यांनी केला आहे. तसेच आता काँग्रेस संपुष्टात येण्याची वेळ जवळ आली आहे. त्यासाठीच आम्ही देशभर लढत आहोत. जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे, असंही म्हटलं आहे.

रमण सिंहांना प्रत्युत्तर देताना भूपेश बघेल यांनी तुमचे आरोप आधी सिद्ध करा किंवा जाहीर माफी मागा. नाही तर योग्य ती कारवाई करून मानहानीचा दावा ठोकण्यात येईल असं सांगितलं. ईडीच्या कारवायांना घाबरतो कोण? ज्यांच्या मनात भीती आहे, तेच घाबरतात असं देखील बघेल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेस