शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Chhattisgarh Assembly Election 2018: मत द्या, नाहीतर तुमची खैर नाही; भाजपा उमेदवाराची मतदारांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 15:18 IST

ओम प्रकाश चौधरी यांची तशी जनतेत चांगली प्रतिमा असतानाही त्यांनी मतदारांनाच धमकी दिली आहे.

रायपूर- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपानं आयएएस ओम प्रकाश चौधरी यांना खरसिया मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. ओम प्रकाश चौधरी यांची तशी जनतेत चांगली प्रतिमा असतानाही त्यांनी मतदारांनाच धमकी दिली आहे. जे लोक चांगल्या कामात मला साथ देणार नाहीत, त्यांची खैर नाही, असं ओ. पी. चौधरी म्हणाले आहेत.ओपी चौधरींचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ते मतदारांना धमकावताना पाहायला मिळत आहेत. मोदीजी 2019मध्ये प्रचंड बहुमताचं केंद्रात सरकार बनवणार आहेत. तर 2018मध्ये चौथ्यांदा छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांचं सरकार येणार आहे. मी भाजपाचा भाग असल्यानं खूप ताकदवान असेन, जे लोक चांगल्या कामात माझी साथ देणार नाहीत, त्यांनाही मी साथ देणार नाही. जे माझ्याबरोबर नसतील, त्यांची खैर नाही, असंही ते म्हणाले आहेत.विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन ते भाजपात सक्रिय झाले आहेत. ते दुसरे तिसरे कोणी नसून रायपूरचे माजी कलेक्टर ओ. पी. चौधरी आहेत. ओ. पी. चौधरी हे 2005च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. खरसियाचे विद्यमान आमदार उमेश पटेल ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, ओ. पी. चौधरीही त्याच अघरिया समाजाचे आहेत. या मतदारसंघातून 1990मध्ये काँग्रेसकडून नंदकुमार पटेल यांनी निवडणूक लढवली होती आणि 2013पर्यंत ते इथले आमदार होते. पाच वेळा विधानसभेवर निवडून येत त्यांनी 22 वर्षं खरसिया मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड एकत्र राज्य असताना काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं होतं.2013मध्ये बस्तरमधल्या झीरम घाटीमध्ये नक्षलींनी त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे पुत्र उमेश पटेल यांना 2013मध्ये काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि निवडून आणलं. खरसिया या मतदारसंघात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 40 टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. तसेच अघरिया समाज, शाहू समाजाचंही प्राबल्य आहे.

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarhछत्तीसगड