छत्रपती शिवरायांच्या व्यूहरचनेला तोड नव्हती-२
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:15+5:302015-02-20T01:10:15+5:30
महिलांप्रती त्यांना विशेष आदर होता. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणसे जोडली. सर्वधर्म समभाव ठेवला. प्रत्येकाला नेतृत्व दिले. ज्येष्ठांचा आदर केला. देशाप्रती समर्पण व त्याग हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. तेव्हा आजच्या पिढीने शिवरायांचा आदर्श जोपासावा, असे आवाहनही त्यांनी केले.

छत्रपती शिवरायांच्या व्यूहरचनेला तोड नव्हती-२
म िलांप्रती त्यांना विशेष आदर होता. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणसे जोडली. सर्वधर्म समभाव ठेवला. प्रत्येकाला नेतृत्व दिले. ज्येष्ठांचा आदर केला. देशाप्रती समर्पण व त्याग हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. तेव्हा आजच्या पिढीने शिवरायांचा आदर्श जोपासावा, असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करीत असताना पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला. विकास आणि जनसमुदाय यांच्यात दरी निर्माण होऊ दिली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. संचालन शैलेंद्र लेंडे यांनी केले. कुलसचिव डॉ. अशोक गोमासे यांनी आभार मानले. बॉक्स.. चीनने अवलंबिली होती छत्रपतींची व्यूहरचना छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला भेटण्यासाठी आगऱ्यात जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या गुप्तहेरांद्वारे संपूर्ण आगऱ्यात स्वत:बद्दल भीतीयुक्त वातावरण निर्माण केले होते. तो रणनीतीचा एक भाग होता. तशीच व्यूहरचना चीनने भारतावर आक्रमण करताना राबविली होती. चीननेसुद्धा भारतावर आक्रमण करतांना याच व्यूहरचनेचा वापर केला असल्याचे डॉ. अरविंद खांडेकर यांनी सांगितले.