शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

छत्तीसगढ: औषध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या तरूणाच्या कानशीलात लगावणाऱ्या 'DM'ना हटवलं; मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 11:51 IST

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झाला होता व्हिडीओ. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी मागितली होती माफी.

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल झाला होता व्हिडीओ.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी मागितली होती माफी.

छत्तीसगढच्या (Chhatisgarh) सरगुजा संभागच्या सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा ( Surajpur DM Ranvir Sharma) यांना तात्काळ प्रभावानं त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. छत्तीसगढमध्ये सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान औषध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या तरूणाच्या त्यांनी कानशीलात लगावली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होती. तसंच छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या पदावरून हटवण्याचे आदेश दिले. "सोशल मीडियाच्या माध्यमातून सूरजपुरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांच्याद्वारे तरूणासोबत होत असलेल्या गैरव्यवहाराचं प्रकरण माझ्या समोर आलं. हे अतिशय दु:खद आणि नींदनीय आहे. छत्तीसगढमध्ये अशाप्रकारचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना तात्काळ प्रभावानं त्यांच्या पदावरून हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," असं बघेल म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली. 

"कोणत्याही अधिकाऱ्याचं शासकीय जीवनात अशा प्रकारचं आचरण खपवून घेतलं नाही जाणार नाही. या घटनेनं मी स्तब्ध झालो आहे. मी त्या तरूणाबद्दल आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल खेद व्यक्त करतो," असंही त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

काय आहे प्रकरण?शनिवारी दुपारी लॉकडाऊनदरम्यान एक तरूण औषधाची चिठ्ठी घेऊन औषध घेण्यासाठी बाहेर पडला होता. त्याचवेळी जिल्हाधिकारी रणबीर शर्मा लॉकडाऊनची पाहणी करण्यासाठी बाहेर आले होते. यादरम्यान, रस्त्यावरील लोकांची ये-जा पाहून त्यांना संताप आला. त्याचवेळी तो तरूण त्यांच्यासमोर आल. आपल्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तरूणाला रोखलं. त्यानंतर त्यांनी त्या तरूणाच्या कानशीलात लगावली. यादरम्यान त्या तरूणानं औषधाची चिठ्ठीही जिल्हाधिकाऱ्यांना दाखवली परंतु त्यांनी त्याचं ऐकलं नाही. इतकंच नाही तर त्यांनी त्या तरूणाचा मोबाईलही घेऊन रस्त्यावर आपटल्याचं व्हायरल (Collector Video Viral) झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी माफीही मागितली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत त्यांना पदावरून हटवलं आहे. 

 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी