चेतन भगत यांचे आज पत्नीसाठी ‘करवा चौथ’
By Admin | Updated: October 11, 2014 00:34 IST2014-10-11T00:34:40+5:302014-10-11T00:34:40+5:30
प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी पत्नी अनुषासाठी शनिवारी ‘करवा चौथ’ उपवास करणार असल्याचे जाहीर केले आहे.

चेतन भगत यांचे आज पत्नीसाठी ‘करवा चौथ’
मुंबई : प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी पत्नी अनुषासाठी शनिवारी ‘करवा चौथ’ उपवास करणार असल्याचे जाहीर केले आहे. ट्विटरवर त्यासंबंधी आवाहन व्हायरल झाल्यानंतर अनेक नामवंतांनी सहभागी होण्याची तयारी दर्शविली असून नॉमिनी म्हणून नावेही सुचवीत आहेत.
शादी डॉट कॉमने सामाजिक उद्देशासाठी खास वेबसाईट तयार करीत अनोखी मोहीम छेडली असून आतापर्यंत ५.३ लाख लोकांनी ‘करवा चौथ’ चा उपवास करणार असल्याचे जाहीर केले आहे. चेतन भगत यांनी रिकाम्या पोटी राहणार असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे तर यू टीव्हीचे रॉनी स्क्रूवाला, मोहित चौहान आणि शेखर गुप्ता यांना नॉमिनी केले आहे.
शादी डॉट कॉम चालविणाऱ्या पीपल ग्रुपचे सीईओ अनुपम मित्तल यांनी ‘फास्ट फॉर हर’ ही कल्पना टिष्ट्वटरवर मांडली आणि नॉमिनी म्हणून चेतन भगत यांच्या नावाचा समावेश करताच आॅनलाईन शपथ घेण्याचा सपाटाच लागला. (प्रतिनिधी)