शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईमध्ये २०१५ नंतरचा सर्वाधिक मुसळधार पाऊस; रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 08:52 IST

चेन्नई शहरात अण्णा युनिव्हर्सिटी परिसरात १६४ मिमी व इतर भागांमध्ये १२७ ते २०० मिमीपर्यंत पाऊस पडला आहे.

चेन्नई : बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तमिळनाडूतील चेन्नई व काही भागांत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला. मात्र, चेन्नईमध्ये २०१५ सालानंतरचा पडलेला सर्वाधिक मुसळधार पाऊस अशी या पावसाची नोंद करण्यात आली. नंगमबक्कम भागामध्ये २१५.३ मिमी, तर मीनांबक्कम येथे ११३.६ मिमी पाऊस पडल्याची रविवारी सकाळी आठ वाजता नोंद करण्यात आली.

चेन्नई शहरात अण्णा युनिव्हर्सिटी परिसरात १६४ मिमी व इतर भागांमध्ये १२७ ते २०० मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. हवामानाचे अभ्यासक आर. प्रदीप जॉन यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले आहे की, शनिवारी रात्रीपासून चेन्नईमध्ये पडलेला पाऊस हा २०१५नंतरचा सर्वाधिक मुसळधार पाऊस आहे.  संततधारेमुळे चेन्नई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. 

आपत्कालीन यंत्रणा सज्ज

तमिळनाडूमध्ये शनिवारी व रविवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. तमिळनाडूच्या पूर्व भागातील किनारपट्टी प्रदेशात पाऊस अधिक प्रमाणात पडत आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसChennaiचेन्नई