चेन्नई, राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या बाहेर
By Admin | Updated: January 23, 2015 10:20 IST2015-01-22T15:50:20+5:302015-01-23T10:20:16+5:30
आयपीएलच्या सामन्यांमध्ये बेटिंग झाल्याचं सिद्ध झाल्याचं सांगताना सुप्रीम कोर्टानं चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना आयपीएलमध्ये सहभागी होता येणार नाही
चेन्नई, राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या बाहेर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - आयपीएलच्या सामन्यांमध्ये बेटिंग झाल्याचं सिद्ध झाल्याचं सांगताना सुप्रीम कोर्टानं चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना आयपीएलमध्ये सहभागी होता येणार नाही असे निकाल दिला आहे. आयपीएल अवघ्या तीन महिन्यांवर आले असल्याने आता नवीन संघ तयार होणार का, सध्याच्या संघातल्या खेळाडुंचे काय होणार, सहा संघांमध्येच आयपीएल होणार का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आयपीएलच्या मॅचेसमध्ये बेटिंग झालं आणि त्यात राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा व चेन्नई सुपर किंग्जचा पदाधिकारी व श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मेयप्पन हे दोघेही दोषी होते असा निकाल गुरुवारी सुप्रीम कोर्टानं दिला आहे. क्रिकेट, प्रशासन हे अत्यंत स्वच्छपणे व पारदर्शीपणे व्हावं असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं असून कुठल्याही प्रकारचे हितसंबंध आड येऊ नयेत असा स्पष्ट इशाराही कोर्टाने बीसीसीआयला दिला आहे. दरम्यान, श्रीनिवासन यांना ते बेटिंगमध्ये सहभागी नसल्याचे सांगत दिलासा दिला असला तरी बीसीसीआयच्या पदाधिका-यांना आयपीएल संघामध्ये मालकी घेऊ देणारी कायद्यातील २.६.४ ही सुधारणा चुकीची असल्याचेही कोर्टाने म्हटले असून त्यामुळे हितंसंबंध जोपासले जातात असे निरीक्षण नोंदवले आहे. त्याचाच आधार घेत बीसीसीआयची येती निवडणूक श्रीनिवासन यांना लढवता येणार नाही असा आदेशही कोर्टाने दिला आहे.
बेटिंगमध्ये दोषी आढळलेल्यांना म्हणजे राज कुंद्रा व गुरुनाथ मेयप्पन यांना काय शिक्षा होईल याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.