लंडनमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:17+5:302015-02-14T01:07:17+5:30
लंडनमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

लंडनमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
ल डनमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूकनागपूर : लंडनमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून व्हिसा काढण्यासाठी ३९ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वंदना प्रकाश बेंजामिन (५२) रा. कुकडे ले आऊट यांच्याशी दिल्ली येथील दोन मोबाईल क्रमांक आणि ई-मेलवरून आरोपी जॉर्ज एडवर्ड रा. मेहरोली एसबीआयसमोर, नवी दिल्ली याने संपर्क साधला. त्याने लंडनच्या लरीफॅशन डिझायनर कंपनीत सहायक व्यवस्थापक पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्याने वंदना बेंजामिन यांचे पासपोर्ट घेऊन व्हिसा काढण्यासाठी ३९ हजार १५० रुपये, सिंडिकेट बँकेत जमा करावयास लावले. पैसे जमा केल्यानंतर आरोपीशी कुठलाच संपर्क न झाल्याने आपली फसवणूक झाल्याची बाब वंदना बेंजामिन यांच्या लक्षात आली. त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.