लॉटरी लागल्याच्या आमिषाने फसवणूक
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30
पुणे : लॉटरी लागल्याचा इमेल पाठवून बक्षिसाचे पैसे मिळवण्यासाठी खात्यामध्ये 85 हजार 500 रुपये भरायला लावत महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 3 जुलै ते 6 जुलैदरम्यान घडली.

लॉटरी लागल्याच्या आमिषाने फसवणूक
प णे : लॉटरी लागल्याचा इमेल पाठवून बक्षिसाचे पैसे मिळवण्यासाठी खात्यामध्ये 85 हजार 500 रुपये भरायला लावत महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 3 जुलै ते 6 जुलैदरम्यान घडली. रोजी राज (वय 30, रा. घोरपडी गाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी व्हाईट मार्टीन, आर. के. गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज या बी. टी. कवडे रस्त्यावरील तारादत्त कॉलनीमध्ये राहण्यास आहेत. आरोपींनी त्यांना पाठवलेल्या इमेलमध्ये लॉटरी लागल्याचे नमूद केले होते. बक्षिसाची रक्कम सोडवून घेण्यासाठी त्यांना आरोपींनी खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी 85 हजार 500 रुपये आरोपींच्या खात्यामध्ये भरले. पैसे भरल्यानंतर आरोपींनी त्यांना लॉटरीचे पैसे न देता फसवणूक केली. ------मोबाईल रिचार्जच्या बहाण्याने फसवलेपुणे : मोठया रकमेचा मोबाईल रिचार्ज बॅलन्स घेतल्यास सवलत देण्याच्या बहाण्याने एकाची 50 हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मेल्वीन शुक्ला (रा. पासर अपार्टमेंट, अंबरनाथ (प.), ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रविंद्र गायकवाड (वय 42, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना मोठ्या रकमेचा मोबाईल बॅलन्स घेतल्यास डिस्काऊंट देतो असे सांगितले. त्यानुसार गायकवाड यांनी 50 हजार रुपये आरोपीच्या खात्यामध्ये भरले. शुल्का यांनी गायकवाड यांना कोणत्याही प्रकारचा बॅलन्स अथवा पैसे परत न देता फसवणूक केली.