शर्तीच्या प्रयत्नानंतरही चावरीयाचा मृत्यू

By Admin | Updated: January 13, 2016 22:49 IST2016-01-13T22:49:36+5:302016-01-13T22:49:36+5:30

गोळीबार बातमी जोड..

Chawari's death even after attempts of peace | शर्तीच्या प्रयत्नानंतरही चावरीयाचा मृत्यू

शर्तीच्या प्रयत्नानंतरही चावरीयाचा मृत्यू

ळीबार बातमी जोड..
जळगाव : भुसावळ येथे बसमध्ये झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या न˜ू देवराम चावरिया (वय ३६ रा.भुसावळ) याच्यावर शर्तीचे प्रयत्न करुनही डॉक्टरांना त्याला वाचविण्यात यश आले नाही. जिल्हा रुग्णालयात संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी त्याची प्राणज्योत मालविली. गोळीबारातील जखमीला जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी तातडीने रुग्णालय गाठून जखमीची भेट घेतली.
या हल्ल्यात खांद्यातून गोळी मागील बाजूस गेली होती. एक्स-रे व शस्त्रक्रिया होईपर्यंत सुपेकर तब्बल एक तास जिल्हा रुग्णालयात थांबून होते. डॉक्टरांशी चर्चा करुन चावरियाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. रक्त पुरवठा करण्यासाठी शरीराचा प्रतिसाद न मिळाल्याने सहा वाजून दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Chawari's death even after attempts of peace