चेंबूरमध्ये नराधमाचा चिमुरडीवर बलात्कार

By Admin | Updated: September 26, 2014 21:40 IST2014-09-26T21:40:29+5:302014-09-26T21:40:29+5:30

चेंबूरमध्ये नराधमाचा चिमुरडीवर बलात्कार

Charmoor Ratha in Chembur | चेंबूरमध्ये नराधमाचा चिमुरडीवर बलात्कार

चेंबूरमध्ये नराधमाचा चिमुरडीवर बलात्कार

ंबूरमध्ये नराधमाचा चिमुरडीवर बलात्कार
मुंबई : घराबाहेर खेळत असलेल्या ६ वर्षांच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना चेंबूर येथे घडली आहे. गोवंडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दिनेश तांबे (१८) या आरोपीला अटक केली आहे.
चेंबूरच्या घाटलेगाव परिसरातील मुक्ती नगर येथे ही चिमुरडी आई-वडिलांसोबत राहते. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती आरोपीच्या घराबाहेर खेळत होती. याच दरम्यान या आरोपीची नजर तिच्यावर पडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने मुलीला खाऊचे आमिष दाखवत घरामध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. काही वेळानंतर मुलगी रडत घरी आली. मुलीच्या आईने तिला याबाबत विचारले असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यांनी तत्काळ या मुलीला शताब्दी रुग्णालयात दाखल करत गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा या आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Charmoor Ratha in Chembur