दोन डॉक्टरांसह चौघांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र गर्भलिंग निदान तपासणी : वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:26+5:302015-02-18T00:13:26+5:30
शेवगाव (अहमदनगर) : दोन डॉक्टरांसह चौघांविरुद्ध ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अण्णासाहेब घावटे यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये शेवगाव न्यायालयात सोमवारी आरोपपत्र दाखल केले आहे.

दोन डॉक्टरांसह चौघांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र गर्भलिंग निदान तपासणी : वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
श वगाव (अहमदनगर) : दोन डॉक्टरांसह चौघांविरुद्ध ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अण्णासाहेब घावटे यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये शेवगाव न्यायालयात सोमवारी आरोपपत्र दाखल केले आहे. वरिष्ठ पथकाच्या स्टींग ऑपरेशनमध्ये दोन सोनोग्राफी मशिन सील करण्यात आले आहेत. औरंगाबाद विभागीय दक्षता कार्यालयाचे अधिकारी डी. एम. मोरे यांच्या पथकास शेवगाव शहरात गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ३१ जानेवारीला पथकाने सापळा रचून एका गर्भवती महिलेस गर्भलिंग निदान करण्यासाठी एका रुग्णालयात पाठविले. मात्र तेथील आया संगीता शिवाजी खंडागळे (शास्त्रीनगर, शेवगाव) हिने येथे गर्भलिंग निदान होत नाही. मात्र मी तुम्हाला दुसर्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. त्यासाठी ३५ हजार रुपये लागतील, असे सांगितले. सदर महिलेने रक्कम देण्याची तयारी दर्शविल्यानंतर ती आया सदर महिलेस डॉ. प्रल्हाद पाटील यांच्या साईपुष्प हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तेथे डॉ. पाटील यांना ३५ हजार रुपये देण्यात आले. नंतर सदर महिलेस गर्भलिंग निदान करण्यासाठी २ फेब्रुवारीला अहमदनगर येथील डॉ. यशवंत पांडुरंग नजन यांच्या अनुपम डायग्नोस्टीक सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे गरोदर महिला रुग्णाची गर्भलिंग निदानाबाबतची सोनोग्राफी तपासणी करण्यात आली. त्यानंतर जनसंपर्क अधिकारी सुरज जगन्नाथ काटकर, (रा. दिल्लीगेट, नगर) यांच्याद्वारे कोड वर्डमध्ये मुलीचा वाढदिवस ऐंशी टक्के साजरा करावा, असे सांगितले. त्यावरून गर्भातील लिंग हे स्त्री जातीचे असल्याचे सांगण्यात आले. ही सर्व माहिती पाळत ठेवून असलेल्या विशेष पथकाने प्रत्यक्ष पाहून पंचांसमक्ष डॉ. पाटील यांना ३५ हजार रुपये व कारसह हॉस्पिटलमधून ताब्यात घेतले. सदर हॉस्पिटलची रेकॉर्ड तपासणी केली असता त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. घावटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. यशवंत नजन, सुरज काटकर, डॉ. प्रल्हाद पाटील, संगीता खंडागळे यांच्याविरुध्द शेवगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. (प्रतिनिधी)