शहांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणा:या पोलिसाची बदली
By Admin | Updated: October 5, 2014 02:21 IST2014-10-05T02:21:14+5:302014-10-05T02:21:14+5:30
कथितरीत्या प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र तयार करणा:या उत्तर प्रदेशच्या दोघा पोलीस अधिका:यांची बदली करण्यात आली आह़े

शहांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणा:या पोलिसाची बदली
>मुजफ्फरनगर : कथितरीत्या प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र तयार करणा:या उत्तर प्रदेशच्या दोघा पोलीस अधिका:यांची बदली करण्यात आली आह़े ही नियमित बदली असून त्याचा अमित शहा प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिका:यांनी केला आहे. तरीही या बदल्यांमुळे राजकीय वतरुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या अहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, शहांविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला होता़ तपास अधिकारी उपनिरीक्षक भरत लाल यांनी प्रकरणाचा तपास केला होता तर पोलीस अधीक्षक योगेन्द्र सिंह यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होत़े तथापि आरोपपत्र कायद्याच्या दृष्टीने सदोष असल्याचे नमूद करत येथील न्यायालयाने ते नाकारले होत़े आयोगाने 4 एप्रिल 2क्14 रोजी शहांवर उत्तर प्रदेशात प्रचार करण्यावर बंदी आणली होती़ या पाश्र्वभूमीवर या दोन्ही अधिका:यांच्या बदलीबाबत संशयाच्या नजरेतून पाहिले जात आहे. (वृत्तसंस्था)