धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याचा पोलिसावर आरोप

By Admin | Updated: May 31, 2017 10:19 IST2017-05-31T09:57:36+5:302017-05-31T10:19:33+5:30

तिने चंदपूर रेल्वे स्थानकावरुन ट्रेन पकडली होती. पीडित महिला ज्या डब्ब्यामध्ये बसली होती. आरोपी सुद्धा तिथेच होता. तो जबरदस्तीने तिला रिकाम्या डब्ब्यात घेऊन गेला.

The charges against the policeman for raping a woman in a running train | धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याचा पोलिसावर आरोप

धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याचा पोलिसावर आरोप

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 31 - ट्रेनमधून प्रवास करणा-या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्याच रेल्वे पोलिसांपैकी एकावर धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली असून पीडित महिला मेरठ येथे राहणारी असून ती लखनऊ-चंदीगड एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. 
 
तिने चंदपूर रेल्वे स्थानकावरुन ट्रेन पकडली होती. पीडित महिला ज्या डब्ब्यामध्ये बसली होती. आरोपी सुद्धा तिथेच होता. तो जबरदस्तीने तिला रिकाम्या डब्ब्यात घेऊन गेला तिथे त्याने बलात्कार केला असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ट्रेन बिजनौर रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर लोकांनी आरोपी जीआरपी पोलीसाला पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. 
 
महिलेच्या तक्रारीवरुन आम्ही आरोपीला अटक केली असून चौकशी सुरु आहे असे रेल्वे पोलीस अधिकारी रवी मोहन शर्मा यांनी सांगितले. जीआरपी राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली काम करते. ट्रेनमधील प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. 
 
 

Web Title: The charges against the policeman for raping a woman in a running train