शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

हाफिज सईदविरुद्ध आरोप निश्चित; दहशतवादाला अर्थसाहाय्य केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 02:56 IST

पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाने पुरावेही सादर केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना आरोपपत्राची प्रत देण्यात आली आहे.

इस्लामाबाद : मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्याविरुद्ध पाकिस्तानातीलदहशतवादविरोधी न्यायालयाने बुधवारी दहशतवादाला अर्थसाहाय्य केल्याचे आरोप निश्चित केले.दहशतवादविरोधी न्यायालयाचे (एटीसी) न्यायाधीश अरशद हुसैन भुट्टा यांनी सईद, हाफिज अब्दुल सलाम बिन मोहम्मद, मोहम्मद अशरफ आणि जफर इकबाल यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले. हे सर्व आरोपी त्यावेळी न्यायालयात हजर होते.

न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सईद आणि त्याच्या साथीदारांनी न्यायालयात अशी विनंती केली की, त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करूनयेत. पंजाबचे उप अभियोजक जनरल अब्दुर रऊफ यांनी आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याची विनंती केली आणि सांगितले की, सईद आणि अन्य आरोपी दहशतवादासाठी अर्थसहाय्य करण्यात सहभागी आहेत.

पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाने पुरावेही सादर केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना आरोपपत्राची प्रत देण्यात आली आहे.एटीसीने ७ डिसेंबर रोजी सईद आणि अन्य एक आरोपी जफर इकबाल यास न्यायालयात हजर केले होते. पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने सईद आणि त्याच्या सहकाºयांविरुद्ध दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याप्रकरणी पंजाब प्रांत आणि विविध शहरांत २३ गुन्हे दाखल केले होते. जमात-उद-दावाच्या या प्रमुखाला १७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तो लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात आहे.

फरार लोकांच्या मीडिया कव्हरेजवर प्रतिबंध

दोषी आणि फरार लोकांच्या मीडिया कव्हरेजवर अंकुश लावण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.पंतप्रधानांचे विशेष सहायक फिरदौस एवान यांनी सांगितले की, पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.माजी पंतप्रधान नवाज शरीफ त्यांची मुलगी मरियम, मुले हसन व हुसैन नवाज आणि माजी वित्तमंत्री इसहाक डार यांच्याशी संबंधित निर्णय म्हणून याकडे पाहिले जात आहे.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादIndiaभारत