शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

सरन्यायाधीशांवरील आरोप: ‘त्या’ तक्रारदार महिलेचे चौकशी समितीवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 02:51 IST

व्हिडीओ रेकॉर्डिंगची मागणी

नवी दिल्ली: सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्यावर असभ्य वर्तनाचे आरोप करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील बडतर्फ महिला कर्मचाºयाने या आरोपांच्या चौकशीसाठी न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ‘इन हाऊस’ चौकशी समितीच्या रचनेस आक्षेप घेतले आहेत.न्यायालयातील विश्वसनीय सूत्रांनुसार येत्या शुक्रवारी चौकशसाठी हजर राहण्याची नोटीस समितीकडून मिळाल्यानंतर या महिलेने चौकशी समितीस एक पत्र लिहून हे आक्षेप घेतले आहेत. सूत्रांनुसार चौकशी समितीवर न्या. एन. व्ही. रमणा यांच्या नियुक्तीस या महिलेचा आक्षेप आहे. ही तक्रारदार महिला पत्रात लिहिते की, न्या. रमणा सरन्यायाधीशांचे अत्यंत निकटवर्ती आहेत. मी सरन्यायाधीशांच्या निवासी कार्यालयात काम करत होते त्यामुळे न्या. रमणा यांचे सरन्यायाधीशांच्या घरी नेहमी येणे-जाणे असते व ते अगदी सरन्यायाधीशांच्या घरच्यासारखे आहेत हे मी अनुभवाने जाणते. त्यामुळे न्या. रमणा समितीवर असले तर नि:ष्पक्ष चौकशी होऊन मला न्याय मिळेल, असे मला वाटत नाही.चौकशी समितीत न्या. इंदिरा बॅनर्जी या एकट्याच महिला सदस्य असण्यासही तक्रारदार महिलेस आक्षेप आहे. त्यासंबंधात ती पत्रात लिहिते की, कामाच्या ठिकाणी होणाºया लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी कशी करावी याचे नियम आधी याच न्यायालयाने विशाखा प्रकरणात ठरवून दिले व नंतर तसा कायदाही केला गेला आहे. त्यानुसार चौकशी समितीत बहुसंख्य सदस्य महिला असाव्यात असे बंधन आहे. त्यामुळे समितीवर तीनपैकी फक्त एकच महिला सदस्य असणे कायद्याला धरून नाही. सूत्रांनी तिच्या पत्राच्या हवाल्याने असेही सांगितले की, गेल्या शनिवारी सरन्यायाधीशांनी स्वत: विशेष खंडपीठात बसून आपल्याविषयी जी एकतर्फी वक्तव्ये केली त्यासही तिने जोरदार आक्षेप नोंदविला आहे.सर्व कामकाजाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग कराचौकशीत नेमके काय झाले याविषयी नंतर कोणत्याही प्रकारच्या वादाला जागा राहू नये यासाठी चौकशीच्या सर्व कामकाजाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जावे व चौकशीत आपल्याला वकील घेण्यास परवानगी मिळावी, अशीही मागणी तिने पत्रात केली असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ranjan Gogoiरंजन गोगोईSupreme Courtसर्वोच्च न्यायालय