राज ठाकरेंविरोधातले दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेच नाही

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30

नवी मुंबई : वाशी पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात केलेले दोषारोप पत्र न्यायालयाने दाखल करून घेतलेले नाही. त्यामुळे न्यायालयाची समजूत काढण्यासाठी पोलिसांनाच न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे. वाशी पोलिसांनी ठाकरे यांच्याविरोधात दोषारोप पत्र तयार केले. त्यानुसार ५ डिसेंबर रोजी वाशी पोलिसांनी ठाकरे यांना नोटीस बजावली. त्यामध्ये ७ दिवसांत सीबीडी येथील वाशी न्यायालयात हजर राहण्याची मुदत दिली होती. परंतु ही नोटीस ठाकरे यांना मिळाल्याची पोच पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. तसेच पोलिसांनी न्यायालयापुढे मांडलेले दोषारोप पत्र देखील दाखल करून घेतलेले नाही. यामुळे वाशी पोलिसांची डोकेदुखी अधिक वाढली आहे. तर न्यायालयापुढे हजर करण्यासाठी ठाकरे यांना आणायचे कसे, असा प्रश्नही पोलिसांना पडला आहे. (प्रतिनिधी)

The charge sheet against Raj Thackeray has not been filed in the court | राज ठाकरेंविरोधातले दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेच नाही

राज ठाकरेंविरोधातले दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेच नाही

ी मुंबई : वाशी पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात केलेले दोषारोप पत्र न्यायालयाने दाखल करून घेतलेले नाही. त्यामुळे न्यायालयाची समजूत काढण्यासाठी पोलिसांनाच न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे. वाशी पोलिसांनी ठाकरे यांच्याविरोधात दोषारोप पत्र तयार केले. त्यानुसार ५ डिसेंबर रोजी वाशी पोलिसांनी ठाकरे यांना नोटीस बजावली. त्यामध्ये ७ दिवसांत सीबीडी येथील वाशी न्यायालयात हजर राहण्याची मुदत दिली होती. परंतु ही नोटीस ठाकरे यांना मिळाल्याची पोच पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. तसेच पोलिसांनी न्यायालयापुढे मांडलेले दोषारोप पत्र देखील दाखल करून घेतलेले नाही. यामुळे वाशी पोलिसांची डोकेदुखी अधिक वाढली आहे. तर न्यायालयापुढे हजर करण्यासाठी ठाकरे यांना आणायचे कसे, असा प्रश्नही पोलिसांना पडला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The charge sheet against Raj Thackeray has not been filed in the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.