शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर! चारधाम यात्रा स्थगित, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:44 IST

उत्तराखंडमध्ये सुरु असेलेल्या चारधाम यात्रेला एका दिवसासाठी स्थगिती देण्यात आली आहे.

Chardham Yatra: उत्तराखंडमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनाच्या भीतीमुळे चार धाम यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट दिला आहे. हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग आणि विकासनगर येथे यात्रेकरूंना थांबविण्याचे निर्देश पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी ही माहिती दिली. प्रतिकूल हवामान परिस्थिती लक्षात घेता, यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे विनय पांडे यांनी म्हटलं.

हवामान परिस्थिती आणि रस्त्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतर चारधाम यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. यासाठी प्रशासन उद्या पुन्हा परिस्थितीचा आढावा घेईल, असं विनय पांडे म्हणाले. भाविकांनी संयम बाळगावा आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. दुसरीकडे, हवामान विभागाने रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवसांसाठी या पर्वतीय राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी वादळ आणि विजांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील बारकोट तहसीलमधील सिलाई बंद भागात भूस्खलनाच्या दुर्दैवी घटनेत अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत. दुसरीकडे, हवामान खात्याने मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर चारधाम यात्रा पुढील २४ तासांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. बागेश्वर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानंतर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.

उत्तरकाशीतील बारकोट येथील सिलाई बंद परिसरात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे. बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी काम करणारे अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल , एनडीआरएफ, पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडRainपाऊस