चप्पलफेकीने बादल यांच्या डोळ््याला इजा

By Admin | Updated: January 12, 2017 01:03 IST2017-01-12T01:03:26+5:302017-01-12T01:03:26+5:30

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल बुधवारी मुक्तसर जिल्ह्यातील त्यांच्या लांबी विधानसभा

Chappalefeni cloud eye injury | चप्पलफेकीने बादल यांच्या डोळ््याला इजा

चप्पलफेकीने बादल यांच्या डोळ््याला इजा

चंदिगढ : पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल बुधवारी मुक्तसर जिल्ह्यातील त्यांच्या लांबी विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी आले असता एका व्यक्तीने फेकलेली चप्पल लागून त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. चप्पल एवढ्या जोराने फेकली गेली होती की ती लागून त्यांचा चष्मा फुटला व डोळ्यातून रक्तस्राव होऊ लागला. बंदोबस्ताला हजर असलेल्या पोलिसांनी चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीला लगेच ताब्यात घेतले. त्याचे नाव गुरबचन सिंग  आहे. निवडणुकांमध्ये व्यत्यय आणण्याचा हा भाग आहे, असा आरोप बादल यांच्या कार्यालयाने केला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Chappalefeni cloud eye injury