शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

JNU मध्ये ‘द साबरमती रिपोर्ट’च्या स्क्रीनिंगदरम्यान गोंधळ; दगडफेकीनंतर विद्यापीठात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 20:05 IST

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आज 'साबरमती रिपोर्ट' चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती.

JNU Delhi :दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) आज 'साबरमती रिपोर्ट' चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती. या स्कीनिंगदरम्यान मोठा गोंधळ झाला. विद्यापीठात लावलेली चित्रपटाची पोस्टर्स फाडण्यात आले. तसेच, दगडफेकीची घटनाही घडली असून, अभाविपने डाव्यांवर याचा आरोप केला आहे. या गोंधळानंतर चित्रपटाचे स्क्रीनिंग थांबवण्यात आले.

डावे पुन्हा पुन्हा तेच करतात, असा आरोप अभाविपच्या एका विद्यार्थ्याने केला आहे. यापूर्वी जेव्हा आम्ही एका चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित केली होती, तेव्हाही त्यांच्याकडून असेच करण्यात आले होते. त्यात एका गार्डच्या पायाला दुखापत झाली होती. आजही डाव्या विद्यार्थ्यांकडून दगडफेक झाली, त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप अभाविपने केला आहे.

बॅडमिंटन कोर्टमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि चित्रपटाचे पोस्टर फाडले. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण आहे. विक्रांत मॅसीचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाची खूप चर्चा झाली. गुजरातमधील 2002 च्या गोध्रा घटनेच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनवण्यात आला असून त्यात अनेक सामाजिक प्रश्नही मांडण्यात आले आहेत.

रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. काहींनी चित्रपटाला एकतर्फी म्हटले आहे, काहींनी त्याचे कौतुक केले आहे, तर दुसरीकडे अनेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त घोषित केला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी हा चित्रपट पाहिला आहे आणि त्याचे भरपूर कौतुकही केले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व कॅबिनेटसाठी या चित्रपटाची स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती.

टॅग्स :delhiदिल्लीjnu - jawaharlal nehru universityजेएनयू