सीताबर्डी आणि हुडकेश्वरमध्ये चेनस्नॅचिंग
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:22+5:302015-01-23T23:06:22+5:30
नागपूर : सीताबर्डी आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेनस्नॅचिंगच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.

सीताबर्डी आणि हुडकेश्वरमध्ये चेनस्नॅचिंग
न गपूर : सीताबर्डी आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेनस्नॅचिंगच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. नम्रता नरेश कन्नैवार (वय ४४, रा. हनुमान गल्ली, झेंडा चौक) या गुरुवारी रात्री ८.१५ ला सीताबर्डी टेम्पल बाजार रस्त्यावर सफरचंद विकत घेत होत्या. पल्सरवर आलेल्या दोन लुटारूंनी नम्रता यांच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. नम्रता यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ नोव्हेंबरला अशीच एक घटना घडली. वंदना प्रकाश पाटील (वय ३१) यांच्या सासूच्या गळ्यातील ६२ हजारांचे मंगळसूत्र लुटारूंनी हिसकावून नेले. या घटनेमुळे सासू आणि सुनेला जबर मानसिक धक्का बसला. प्रकृती खराब झाल्यामुळे पाटील पोलिसांकडे तक्रार देऊ शकल्या नाही. गुरुवारी तक्रार मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.----