शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

चंद्रयान-सूर्ययान यशस्वी, 20 वर्षांपासून 'राहुलयान'ची लॉन्चिंग अपयशी; राजनाथ सिंह यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 19:07 IST

राजनाथ सिंह यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त टीका करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे सुपूत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udaynidhi Stalin) यांच्या सनातन धर्मावरील  (Sanatan Hindu Dharma) वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन अनेक भाजप नेते डीएमकेसह काँग्रेसवरही टीका करत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच, राहुल गांधींना शेलक्या शब्दात टोलाही लगावला. 

द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यावरुन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी विरोधकांवर निशाणा साधला. काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अशोक गेहलोत या मुद्द्यावर गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजस्थानमध्ये भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या तिसर्‍या फेरीच्या शुभारंभप्रसंगी जैसलमेरमधील रामदेवरा येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधींवरही शेलक्या शब्दात टीका केली. चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले, परंतु 'राहुल्यान' अद्याप लॉन्च किंवा लँड झाले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह म्हणाले, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यांचे सनातन धर्माबाबत काय विचार आहेत? इंडिया आघाडीचा पक्ष असलेल्या द्रमुकने सनातन धर्माला दुखावले आहे आणि काँग्रेस नेत्यांनी या विषयावर मौन बाळगले. सनातन धर्माचा अपमान केल्याबद्दल इंडिया आघाडीच्या सदस्यांनी माफी मागावी, अन्यथा देश त्यांना माफ करणार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, सनातन धर्म जगाला एक कुटुंब मानतो. हा धर्म 'वसुधैव कुटुंबकम' (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) असा संदेश देतो. या धर्मात मुंग्यांना पीठ अन् सापाला दूध पाजण्याची आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. अशा धर्माबाबत उदयनिदी स्टॅलिन यांनी वादग्रस्त टीका केली. त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमcongressकाँग्रेसBJPभाजपाTamilnaduतामिळनाडू