शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

भारताच्या चंद्रयान-3 चे खरे ‘हिरो’, यांच्याच मेहनतीमुळे भारताने रचला इतिहास; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 18:41 IST

Chandrayaan-3 Team: भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे.

Chandrayaan 3 Team: आज भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे. इस्रोची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम यशस्वी झाली आहे. चंद्रयान-3 चे "विक्रम" हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरले आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. वर्षानुवर्षे या मोहिमेवर काम करणारी इस्रोची टीम या मिशनमागे आहे.

इस्रोची तिसरी चंद्र मोहीम मागील दोन मोहिमांपेक्षा खूपच वेगळी आहे. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमने मिशनला अशा टप्प्यावर नेले की संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे होते. चंद्रयान-3 च्या तयारीसाठी 3 वर्षे, 9 महिने आणि 14 दिवस लागले. यामागे दिग्गजांची टीम आहे, ज्यांच्यामुळे भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जाणून घ्या, या मिशनमागे कोण आहेत.

डॉ. एस. सोमनाथ: चंद्रयान-3 च्या रॉकेटची रचनाडॉ. एस. सोमनाथ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष असण्यासोबतच या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या मोहिमेतील रॉकेटच्या लॉन्च व्हीकल तयार केले आहे. याच्याच मदतीने चंद्रयान-3 चे प्रक्षेपण झाले. भारताची ही तिसरी चंद्र मोहीम आहे. बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिकलेल्या डॉ. एस. सोमनाथ यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये या मिशनची जबाबदारी मिळाली होती. इस्रोच्या आधी डॉ. सोमनाथ हे विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि फ्लोटिंग प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे संचालकही राहिले आहेत. चंद्रयान-3 नंतर दोन मोठ्या मोहिमांची कमान डॉ. एस. सोमनाथ यांच्या हाती असेल. यामध्ये आदित्य-L1 आणि गगनयानचा समावेश आहे.

पी वीरामुथुवेल: चंद्रावरील अनेक शोधांसाठी ओळखले जातातपी वीरमुथुवेल हे प्रोजेक्टर डायरेक्टर म्हणून मिशनचे नेतृत्व करत आहेत. त्यांना 2019 मध्ये मिशन चंद्रयानची जबाबदारी देण्यात आली होती. पी वीरमुथुवेल हे यापूर्वी इस्रोच्या मुख्य कार्यालयातील अंतराळ पायाभूत सुविधा कार्यक्रम कार्यालयात उपसंचालक होते. इस्रोच्या दुसऱ्या चंद्र मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तामिळनाडूतील विल्लुपुरम येथे राहणारे पी वीरामुथुवेल यांनी आयआयटी मद्रासमधून पदवी प्राप्त केली आहे. चंद्रावर चंद्रयान 2 फ्लॉट्सम आणि जेट्सम शोधण्यासाठी देखील त्यांची ख्याती होती. 

एस उन्नीकृष्णन नायर: रॉकेट बांधण्याची जबाबदारी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक आणि एरोस्पेस अभियंता डॉ. उन्नीकृष्णन यांच्याकडे चंद्रयान-3 शी संबंधित अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. या मोहिमेसाठी, रॉकेटच्या विकासाची आणि बांधकामाची जबाबदारी त्यांच्याकडे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) मार्क-III केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये तयार करण्यात आले.

एम शंकरन: इस्रोचे उपग्रह डिझाइन आणि तयार करण्याची जबाबदारीएम शंकरन हे UR राव उपग्रह केंद्राचे (URSC) संचालक आहेत. या संस्थेकडे इस्रोचे उपग्रह तयार करण्याची आणि डिझाइन करण्याची जबाबदारी आहे. शंकरन यांच्या नेतृत्वाखाली ही टीम सॅटेलाइट कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, रिमोट वर्किंग, हवामान अंदाज आणि ग्रहांचा शोधाचे काम करते. एम शंकरन यांनी 1986 मध्ये तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. यानंतर ते इस्रोच्या उपग्रह केंद्रात रुजू झाले. 

मोहना कुमार: मिशन डायरेक्टरएस मोहन्ना कुमार हे LVM3-M4/चंद्रयान-3 चे मिशन डायरेक्टर आहेत आणि ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. एस मोहन्ना हे यापूर्वी LVM3-M3 मिशनवर वन वेब इंडिया 2 उपग्रहांच्या व्यावसायिक प्रक्षेपणाचे संचालक होते. एस मोहन्ना कुमार म्हणाले, "LVM3-M4 पुन्हा एकदा इस्रोसाठी सर्वात विश्वासार्ह हेवी लिफ्ट वाहन असल्याचे सिद्ध झाले आहे. इस्रो परिवाराच्या टीमवर्कसाठी अभिनंदन."

ए राजराजन: लाँच ऑथोरायझेशन बोर्डाचे प्रमुखए राजराजन हे सतीश धवन स्पेस सेंटर SHAR (SDSC SHAR) चे संचालक आहेत, जे श्रीहरिकोटा येथे आहे, हे भारताचे प्रमुख अंतराळ पोर्ट आहे. SDSC SHAR चे संचालक असल्याने, ते इस्रो प्रक्षेपण आणि मानवी अंतराळ कार्यक्रम (गगनयान) आणि SSLV च्या प्रक्षेपणांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रक्षेपणाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे प्रमुख होते.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रोIndiaभारतAmericaअमेरिका