शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Chandrayaan 2 : देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधानांच्या भाषणामुळे शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावले - सिवन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 09:57 IST

देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण यामुळे शास्त्रज्ञांचं मनोधैर्य उंचावल्याचं सिवन यांनी सांगितलं.

ठळक मुद्देदेशाचा पाठिंबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण यामुळे शास्त्रज्ञांचं मनोधैर्य उंचावल्याचं सिवन यांनी सांगितलं.इस्रो प्रमुख के. सिवन भावूक झाले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना जवळ घेत मिठी मारली.पंतप्रधानांचं एक वेगळं रूप आम्हाला पाहायला मिळाल्याचं सिवन यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

नवी दिल्ली - लँडर विक्रमचं स्थान समजलं असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी रविवारी दिली. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरने विक्रमचा फोटो पाठवला आहे. मात्र अद्याप विक्रमशी संपर्क झालेला नाही, असं सिवन यांनी सांगितलं. तसेच देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण यामुळे शास्त्रज्ञांचं मनोधैर्य उंचावल्याचं सिवन यांनी सांगितलं. देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सर्व शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं. इस्रो प्रमुख के. सिवन भावूक झाले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना जवळ घेत मिठी मारली आणि धीर दिला होता.

सिवन यांनी 'विक्रम’ चंद्रावर अलगद उतरू न शकल्याचे कळल्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला धीर व देशभरातून व्यक्त होत असलेल्या पाठिंब्याने ‘इस्रो’मधील वैज्ञानिकांना नवा हुरूप आला आहे' असं म्हटलं आहे. तसेच देशाने आम्हाला चांगला व सकारात्मक पाठिंबा दिला. पंतप्रधानांचं एक वेगळं रूप आम्हाला पाहायला मिळाल्याचं सिवन यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

'इस्रो' चं 'नासा' कडूनही कौतुक झालं आहे. ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने कौतुक करताना म्हटले की, अवकाशातील कामगिरी कठीणच असते. चांद्रयान-2 मोहिमेत ‘इस्रो’ने केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे व त्याने आम्हालाही स्फूर्ती मिळाली आहे. नासाने म्हटले की, आपण दोघे मिळून सौरमंडळाचा आणखी शोध घेण्याची संधी मिळेल, याची आम्हाला आतुरतेने प्रतिक्षा आहे. 'इस्रो' चे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन म्हणाले की, पंतप्रधान आणि देशवासीय ठामपणे पाठिशी उभे राहिल्याने आम्ही सर्वच भारावून गेलो आहोत. त्या क्षणाला आम्ही याची कल्पनाही केली नव्हती. 

चांद्रयान 2 ऑर्बिटरनं लँडर विक्रमचा फोटो पाठवला आहे. त्यामुळे लँडरचं स्थान समजलं आहे. आता विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं सिवन म्हणाले. चंद्राची परिक्रमा करणाऱ्या ऑर्बिटरनं रविवारी विक्रमची थर्मल इमेज पाठवली आहे. त्यामुळे विक्रमच्या स्थानाची माहिती समजू शकली आहे, असं सिवन यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. इस्रोला अद्याप विक्रमशी संपर्क साधता आलेला नाही. त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सिवन यांनी दिली. पुढील 14 दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ऑर्बिटरकडून मिळणारी माहिती अतिशय महत्त्वाची असेल, असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. 

चंद्रावर उतरण्यासाठी केवळ दोन किलोमीटरचं अंतर शिल्लक असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. विक्रम लँडरचे चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना त्याचं काम व्यवस्थित सुरू होतं. त्यानंतर विक्रम लँडरचा इस्रोबत असलेला संपर्क तुटला. सध्या या घटनेचं विश्लेषण इस्त्रोकडून सुरू आहे. चांद्रयान-2 मोहीम जवळपास 95 टक्के यशस्वी झाली आहे. चंद्रयान-2 चा ऑर्बिटर जवळपास 7.5 वर्षापर्यंत काम करु शकतो. तसंच, गगनयानसह इस्रोच्या अन्य अंतराळ मोहिमादेखील वेळेतच पूर्ण होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2K. Sivanके. सिवनisroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतNASAनासा