शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

Chandrayaan 2: विक्रम लँडरचे तुकडे सापडले; नासाकडून फोटो प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 7:25 AM

एक किलोमीटर अंतरावरुन काढलेला फोटो नासाकडून प्रसिद्ध

नवी दिल्ली: अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं चांद्रयान-२ मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा नासाकडून करण्यात आला आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचे फोटो टिपला आहे. हा फोटो नासाकडून ट्विट करण्यात आला आहे. ७ सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोनं अनेकदा विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात इस्रोला अपयश आलं. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं (एलआरओ) चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरणार होतं, त्यापासून 750 मीटर अंतरावर नासाला त्याचे तुकडे सापडले आहेत. विक्रमचे तीन मोठे तुकडे 2x2 पिक्सलचे आहेत. नासानं रात्री दीडच्या सुमारास विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला. लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरला विक्रमचे तीन तुकडे दिसल्याची माहिती नासानं ट्विटमधून दिली.  नासानं एक किलोमीटर अंतरावरुन विक्रम लँडरचे फोटो टिपले आहेत. यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या क्रॅश लँडिंगमुळे झालेला परिणाम दिसून येत आहे. विक्रमला चंद्रावर यशस्वी लँडिंग करता आलं नाही. विक्रमचं लँडिंग चुकल्यानं त्याचे चंद्राच्या पृष्ठभागावर झालेले परिणाम नासानं टिपलेल्या फोटोत स्पष्टपणे दिसत आहेत. इस्रोनं नासाशी संपर्क साधून विक्रम लँडरसंदर्भातील विस्तृत माहिती मागितली आहे. नासा विक्रम लँडरबद्दलचा एक अहवाल इस्रोला देणार आहे. यामधून विक्रमच्या क्रॅश लँडिंगबद्दलची अधिक माहिती मिळू शकेल. विक्रम लँडरच्या संदर्भातील माहिती मिळण्याची शक्यता नासानं याआधीच व्यक्त केली होती. विक्रमचं क्रॅश लँडिंग झालेल्या भागावरुन लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटर जाणार असल्यानं विक्रम लँडरशी संबंधित माहिती हाती लागू शकते, अशी शक्यता नासाकडून वर्तवण्यात आली होती. याआधी १७ सप्टेंबरला नासाचं ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साईटवरुन गेलं होतं. मात्र त्यावेळी विक्रमशी संबंधित माहिती नासाला मिळाली नव्हती. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2NASAनासाisroइस्रो