Chandrayaan-2: Good news ... chandrayaan 2 isro moon mission important changes launching scientists shriharikota rocket satellite space technology | Chandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’
Chandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’

नवी दिल्ली :  भारताची ‘चांद्रयान-2’ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम आज दुपारी होणा-या प्रक्षेपणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) काल जाहीर केले आहे.

चांद्रयान-2’ मोहिमेवर जाणा-या ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ या शक्तिशाली रॉकेटचे आज दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार आहे. यानंतर ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवार्यंत पोहोचण्यास 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. जवळपास 16.23 मिनिटानंतर ‘चांद्रयान-2’ पृथ्वीपासून 182 किमी अंतरावर ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत घिरट्या घालेल. 

दरम्यान, आता ‘चांद्रयान-2’ आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी 15 जुलैच्या प्रक्षेपणाच्या तुलनेत आज होणाऱ्या प्रक्षेपणात काही बदल केले आहे. काय बदल आहेत, याविषयी आपण जाणून घेऊया...


1) पृथ्वीच्या कक्षेत जाण्यासाठी लागणारा वेळ एक मिनिटांनी वाढविला 
22 जुलै : ‘चांद्रयान-2’ आता 974.30 सेकंदात (जवळपास 16.23 मिनिट) पृथ्वीपासून 181.65 किमीच्या उंचीवर पोहोचेल. 
15 जुलै : ‘चांद्रयान-2’ आधी 973.70 सेकंदात (जवळपास 16.22 मिनिट) पृथ्वीपासून 181.61 किमीच्या उंचीवर पोहोचणार होते. 

2) पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार चक्करमध्ये बदल, एपोजीमध्ये 60.4 किमीचे अंतर
22 जुलै : ‘चांद्रयान-2’च्या प्रक्षेपणानंतर पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार कक्षात घिरट्या घालेल. याचा पेरिजी (पृथ्वीपासून कमी अंतर) 170 किमी आणि एपोजी (पृथ्वीपासून जास्त अंतर) 39120 किमी असणार आहे. 
15 जुलै : ‘चांद्रयान-2’ जर लाँच झाले असते तर याचा पेरिजी 170.06 किमी आणि एपोजी 39059.60 किमी होणार होता. म्हणजेच एपोजीमध्ये 60.4 किमी अंतर आणले असते. तसेच, पृथ्वीच्या चारी बाजूने घालणाऱ्या घिरट्या कमी केल्या असत्या. 


3) चंद्रावर पोहोचण्याच्या कालावधीत 6 दिवसांनी कमी  
‘चांद्रयान-2’ जर 15 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले झाले असते तर 6 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले असते. मात्र. आज 22 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठी 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच, ‘चांद्रयान-2’ हे 6 सप्टेंबरलाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार आहे. ‘चांद्रयान-2’ आता पृथ्वीच्या चारी बाजूने 5 च्याऐवजी 4 घिरट्या घालणार आहे. 

4) वेलोसिटीमध्ये 1.12 मीटर प्रति सेकंद वाढ
‘चांद्रयान-2’ चे आज प्रक्षेपण झाल्यानंतर चंद्रावर जास्त वेगात जाणार आहे. आता अंतराळात याचा वेग 10305.78  मीटर प्रति सेंकद असणार आहे. जर, 15 जुलैला प्रक्षेपण झाले असते तर याचा वेग 10,304.66 मीटर प्रति सेकंद असता. म्हणजेच, आज होणाऱ्या प्रक्षेपणात ‘चांद्रयान-2’ चा वेग 1.12 मीटर प्रति सेकंद वाढविण्यात आला आहे. Web Title: Chandrayaan-2: Good news ... chandrayaan 2 isro moon mission important changes launching scientists shriharikota rocket satellite space technology
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.