के. चंद्रशेखर राव तिरुपतीला पाच कोटींचे दागिने करणार अर्पण

By Admin | Updated: February 21, 2017 19:00 IST2017-02-21T18:50:00+5:302017-02-21T19:00:33+5:30

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव प्रसिद्ध तिरुपती मंदिराला जवळपास पाच कोटींचे दागिने चढवणार आहेत.

Of Chandrasekhar Rao will donate five crores ornaments to Tirupati | के. चंद्रशेखर राव तिरुपतीला पाच कोटींचे दागिने करणार अर्पण

के. चंद्रशेखर राव तिरुपतीला पाच कोटींचे दागिने करणार अर्पण

ऑनलाइन लोकमत
विजयवाडा, दि. 21 - तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव प्रसिद्ध तिरुपती मंदिराला जवळपास पाच कोटींचे दागिने चढवणार आहेत. 
तेलंगण हे स्वतंत्र राज्य स्थापन व्हावे यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी भगवान व्यंकटेश्वराला नवस केला होता. त्यानंतर तेलंगणच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच ते तिरुपतीच्या दर्शनासाठी जात आहेत. 
के. चंद्रशेखर राव आपल्या फॅमिलीसह कॅबिनेटमधील काही सहका-यांसोबत उद्या सकाळी तिरुपतीला येणार आहेत. त्यानंतर भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांचं दर्शन घेतल्यानंतर काही दागदागिने अर्पण करणार आहेत. 
के. चंद्रशेखर राव यांनी केलेला नवस फेडण्यासाठी ते भगवान व्यंकटेश्वराला सोन्याचा 'शालीग्राम हरम' अर्पण करतील, तर देवी पद्मावतीला 'मकर कंठी' अर्पण करणार आहेत, अशी माहिती तेलंगण सरकारचे सल्लागार के. व्ही. रमणचारी यांनी दिली.
दरम्यान, या दागिन्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहे. 
 

 

Web Title: Of Chandrasekhar Rao will donate five crores ornaments to Tirupati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.