शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 14:58 IST

आज चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची, तर अभिनेते पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Chandrababu Naidu Oath Taking Ceremony : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) विधानसभा निवडणुकीत तेलुगु देसम पक्षाचे (TDP) प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी एकहाती विजय मिळवला. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इतर अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य शपथविधी साहळा पार पडला. राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी नायडू भावूक झाले आणि मोदींच्या भेटीवेळी त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, मात्र मोदींनी त्यांना थांबवून घट्ट मिठी मारली.

शपथ घेतल्यानंतर चंद्राबाबू भावूक आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात अनेक भावूक क्षण पाहायला मिळाले. आजच्या शपथविधी सोहळ्यात पीएम मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री, विविध सेलिब्रिटी आणि हजारो समर्थकांची उपस्थिती होती. प्रचंड संघर्षानंतर राज्याची सत्ता मिळाल्यामुळे 74 वर्षीय नायडू खुप भावूक झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यानंतर नायडूंनी पंतप्रधानांच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण पंतप्रधान मोदींनी लगेचच त्यांना रोखून त्यांची गळाभेट घेतली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी एनडीएच्या बैठकीत सीएम नितीश कुमार यांनीदेखील मोदींच्या पायाला स्पर्ष करण्याचा प्रयत्न केला होता, पण मोदींनी त्यांनाही रोखले होते.

नायडूंनी घेतला अपमानाचा बदलाविशेष म्हणजे, 2021 मध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या (Jagan Mohan Reddy) वायएसआर काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी पत्नीचा अपमान केल्याचा आरोप केल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेतून वॉकआउट केले होते. त्यावेली त्यांनी शपथ घेतली होती की, ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच पुन्हा विधानसभेत पाऊल ठेवतील. पाच वर्षे जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधात लढा देत आज अखेर नायडूंनी आपल्या अपमानाचा बदला घेतला.

पवन कल्याण राज्याचे उपमुख्यमंत्रीसीएम नायडूं यांच्यासह शपथ घेणाऱ्यांमध्ये आणखी एक मोठे नाव म्हणजे दक्षिणेतील सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) यांचे आहे. जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांना आंध्रचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पवन कल्याण यांनी त्यांचा मोठा भाऊ मेगास्टार चिरंजीवीच्या चरणांना स्पर्श करुन आशीर्वाद घेतला. विशेष म्हणजे, पवन कल्याण यांनीदेखील या मोठ्या विजयासह भावाच्या अपमानाचा बदला घेतला आहे. काही काळापूर्वी चिरंजीवी जगन मोहन यांना भेटायला गेले होते, त्यावेळी त्यांचा अपमान करण्यात आला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चिरंजीवीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

किती मंत्र्यांनी शपथ घेतली?विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळील केसरपल्ली आयटी पार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण 24 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्र्यांमध्ये जनसेनेचे तीन आणि भाजपच्या एका मंत्र्याचा समावेश आहे. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सोहळ्यात माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, भारताचे माजी सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा, केंद्रीय मंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, राम मोहन नायडू, पेम्मासानी चंद्रशेखर, चिराग पासवान, किशन रेड्डी, रामदास आठवले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेश भाजप अध्यक्ष डी. पुरंदेश्वरी, सुपरस्टार रजनीकांत, चिरंजीवी, लोकप्रिय अभिनेते आणि टीडीपीचे आमदार एन. बालकृष्ण हेही उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीBJPभाजपा