शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबू अन् ममतां दीदींचा मोदी सरकारला झटका; सीबीआयला आंध्र, बंगालबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 06:34 IST

संबंध अधिक बिघडणार : पोलिसांचे मिळणार नाही सहकार्य, तपासासाठी आता घ्यावी लागेल राज्य सरकारची परवानगी

अमरावती : मोदी सरकारमधून बाहेर पडलेले आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आणि कायम भाजपाविरोधी भूमिका घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला जोरदार झटका दिला. केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील सीबीआय या तपास यंत्रणेला यापुढे आंध्रातील कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करता येणार नाही वा आंध्र प्रदेशातील पोलीसही सीबीआयच्या तपासात मदत करणार नाहीत.

दिल्ली विशेष पोलीस कायद्यान्वये आंध्र प्रदेशात तपास करण्यावर चंद्राबाबू नायडू सरकारने बंदी घातली आहे. राज्य पोलिसांनी सीबीआयला कोणतेही सहकार्य करू नये, असे आंध्र सरकारने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकार व आंध्र प्रदेश सरकार समोरासमोर आले असून, एखाद्या राज्याला असे आदेश काढण्याचा अधिकार आहे का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. यापुढे आंध्र प्रदेशात कोणत्याही तपासासाठी जाताना सीबीआय अधिकाºयांना तेथील सरकारची मंजुरी घ्यावी लागेल.एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, सीबीआयला तपासासाठी सहकार्य न करण्याचा वा त्यांना रोखण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.

दिल्ली विशेष पोलीस कायद्यातील कलम ५ अन्वये सर्व राज्यात तपास करण्याचा अधिकार सीबीआयला असला तरी त्यातील कलम ६ अन्वये राज्य सरकारच्या संमतीशिवाय सीबीआय त्या राज्यात तपास करू शकत नाही. आंध्र प्रदेश सरकारने त्यामुळे कलम ६ अन्वये सीबीआयला रोखले आहे. त्याच कलमाच्या आधारे ममता बॅनर्जी यांनीही सीबीआयला आपल्या राज्यात कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करू न देण्याचे ठरवले आहे.

चंद्राबाबू नायडू सरकारच्या या आदेशावर केंद्र सरकार वा सीबीआय यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सध्या आंध्र प्रदेशात कोणत्याही मोठ्या प्रकरणात सीबीआय तपास करीत नसल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. राकेश अस्थाना-आलोक वर्मा वादाच्या प्रकरणात ज्याचे नाव येत आहे, ते मांस उत्पादक मोईन कुरेशी व सतीश बाबू साना यांचा आंध्र प्रदेशशी संबंध असला तरी त्यासंबंधीचा एफआयआर दिल्लीमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे त्या तपासात आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

सीबीआय घोटाळ्यांमध्ये अधिकाºयांची नावे आल्याच्या पार्श्वभूमीवर आंध्रने आधी राज्यातील सीबीआय तपासावर आक्षेप घेतला होता. यापुढे कोणत्याही प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारतर्फे सीबीआयला बोलावण्यात येणार नाही, असे आंध्र सरकारने स्पष्ट केले आहे.चंद्राबाबू सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने वायएसआर काँग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांना हाताशी धरले असून, प्राप्तिकर विभाग व सीबीआय यांचाही त्यासाठी वापर केला जात आहे, असा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अलीकडेच केला होता. सीबीआयला रोखण्याचे हेही एक कारण असू शकते, असे सांगण्यात येत आहे.आलोक वर्मा यांना थोडी खुशी, थोडा गमसीबीआयच्या संचालक असतानाच रजेवर पाठवण्यात आलेल्या आलोक वर्मा यांना केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) तपास अहवालातून बराच दिलासा मिळाला असला तरी त्यांच्याविषयी काही प्रश्नही उपस्थित झाले आहेत. सीव्हीसीचा हा अहवाल म्हणजे वर्मा यांच्यासाठी ‘थोडी खुशी, थोडा गम’ असाच आहे. वृत्त/देश-परदेश

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागMamata Banerjeeममता बॅनर्जीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू