शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; चंद्रशेखर पेम्मासानी यांची संपत्ती वाचून व्हाल धक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 10:41 IST

Chandra Sekhar Pemmasani : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत.

नवी दिल्ली : मोदी सरकार ३.० मध्ये अनेक नवीन आणि तरुण खासदारांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आहे. विशेषत: मित्रपक्षांबद्दल बोलायचे झाल्यास, तेलगू देसम पक्षाच्या कोट्यातून ३६ वर्षीय राममोहन नायडू यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्याता आली आहे. तर, तेलुगु देसम पक्षाचे चंद्रशेखर पेम्मासानी यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत.

चंद्रशेखर पेम्मासानी हे आंध्रप्रदेशच्या गुटूंर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी ३ लाख ४० हजार मतांच्या फरकाने विरोधी उमेदवाराला धूळ चारली. चंद्रशेखर पेम्मासानी हे ५ हजार ७०० कोटी रुपयांचे मालक आहेत. चंद्रशेखर पेम्मासानी यांची ही पहिलीच निवडणूक आहे. तर, राममोहन नायडू हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथून लोकसभेचे खासदार आहेत. राममोहन नायडू हे तेलुगु देसम पक्षाचे सरचिटणीस असून पक्षाचे ज्येष्ठ नेते येरेन नायडू यांचे पुत्र आहेत. 

दरम्यान,आंध्रप्रदेशच्या गुटूंरच्या बुर्लिपलेम गावात जन्माला आलेले चंद्रशेखर पेम्मासानी यांनी उस्मानिया विद्यापिठातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाच्या रुग्णालयात ५ वर्ष काम केले. त्यांनी विद्यापिठातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचेही काम केले. चंद्रशेखर पेम्मासानी हे एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म यूवर्ल्डचे संस्थापक आणि सीईओ आहेत. तसेच, चंद्रशेखर पेम्मासानी हे टीडीपीच्या एनआरआय सेलच्या दिर्घकाळापासून सक्रिय होते. 

जीतन राम मांझी हे सर्वात ज्येष्ठ मंत्री३७ वर्षीय रक्षा निखिल खडसे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण महिल्या मंत्री ठरल्या आहेत, तर ७९ वर्षीय जीतन राम मांझी हे सर्वात वयस्कर मंत्री ठरले आहेत. रक्षा खडसे यांनी मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. दरम्यान, ७९ वर्षीय मांझी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मांझी हे बिहारचे मुख्यमंत्री होते आणि ते हिंदुस्थानी अवाम मोर्चा (HAM) चे संस्थापक अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे कल्याण मंत्री होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते गया मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४