चांदिवलीत उत्तर भारतीय संघ सेनेमागे

By Admin | Updated: October 7, 2014 02:17 IST2014-10-07T02:17:53+5:302014-10-07T02:17:53+5:30

चांदिवली विधानसभा मतदार क्षेत्रासाठी शिवसेनेचे उत्तर भारतीय उमेदवार संतोष सिंह हे उत्तर भारतीय संघाचे विश्वस्त म्हणून काम पाहत असल्याने आहे उत्तर भारतीय संघाने शिवसेनेलाच पाठिंबा जाहीर केला आहे.

Chandivali North India Union | चांदिवलीत उत्तर भारतीय संघ सेनेमागे

चांदिवलीत उत्तर भारतीय संघ सेनेमागे

मुंबई: चांदिवली विधानसभा मतदार क्षेत्रासाठी शिवसेनेचे उत्तर भारतीय उमेदवार संतोष सिंह हे उत्तर भारतीय संघाचे विश्वस्त म्हणून काम पाहत असल्याने आहे उत्तर भारतीय संघाने शिवसेनेलाच पाठिंबा जाहीर केला आहे.
उत्तर भारतीयांच्या पाठिंब्याच्या जोरावर काँग्रेसचे उमेदवार नसीम खान तब्बल तीन वेळा चांदिवलीतून निवडून आले. पण विकासकामे करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे उत्तर भारतीयांसाठी हक्काचा उमेदवार म्हणून संतोष सिंग यांना परिसरात पाठिंबा वाढत आहे.
चांदिवलीत चौरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे नसीम खान, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मनसेचे ईश्वर तायडे रिंगणात आहेत. उत्तर भारतीय संघ मुंबईचे अध्यक्ष आय.एन. सिंह यांचे चिरंजीव संतोष सिंह यांना त्यांच्या सभांमध्ये पाठिंबा वाढत आहे. या मतदार संघात निर्णायक ठरणारी उत्तर भारतीय वोट बँक शिवसेनेच्या बाजूने असल्याने संतोष सिंह यांचे पारडे जड आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chandivali North India Union