शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Chandipura Virus : सावधान! कोरोनापेक्षाही धोकादायक आहे चांदीपुरा व्हायरस?; WHO ने दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 14:06 IST

Chandipura Virus : चांदीपुरा व्हायरस भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगाने पसरत आहे. आता त्याचा मृत्यूदर ३३ टक्क्यांवर पोहोचला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे

चांदीपुरा व्हायरस भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगाने पसरत आहे. आता त्याचा मृत्यूदर ३३ टक्क्यांवर पोहोचला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गेल्या २० वर्षांत भारतात हा धोकादायक आजार झपाट्याने वाढल्याचं WHO ने मान्य केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आत्तापर्यंत चांदीपुरा व्हायरलची २४५ प्रकरणं भारतात नोंदवली गेली आहेत. गेल्या २० वर्षांतील हा उच्चांक आहे.

'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'नुसार, जूनच्या सुरुवातीपासून ते १५ ऑगस्टपर्यंत ८२ मृत्यू झाले आहेत. चांदीपुरा व्हायरसचा पुढील प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वेक्टर नियंत्रण आणि माश्या, डास आणि टिक्स यांच्यापासून बचाव करण्याची शिफारस केली आहे. १५ ऑगस्ट दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने AES (एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम) ची २४५ प्रकरणं नोंदवली. ज्यामध्ये ८२ मृत्यूंचा समावेश आहे. ६४ प्रकरणं चांदीपुरा व्हायरसची आहेत. 

WHO ने दिला इशारा 

WHO ने म्हटलं आहे की,  चांदीपुरातील व्हायरस आधीच कमी होत आहेत. मात्र याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. कारण पाऊस पडल्यानंतर डास आणि माशांमुळे रोगराईचा धोका वाढतो. कारण त्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होतो. बाधित लोकांचे नमुने घेतले जातात. या आजाराची वेळीच ओळख झाली तर मृतांची संख्या कमी होऊ शकते.

चांदीपुरा व्हायरसची लक्षणं

चांदीपुरा व्हायरसची लागण झालेल्या मुलांना अचानक जास्त ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, डोकेदुखी, मेंदूला सूज येणं यासारखी लक्षणं दिसतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या व्हायरसची लागण झालेली मुलं लक्षणं दिसल्यानंतर ४८-७२ तासांच्या आत मरतात. अशा परिस्थितीत हा व्हायरस लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी घातक मानला जातो. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना