शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

आईचा मृतदेह घेण्यास पोटच्या मुलांकडून नकार, मुस्लिम कुटुंबानं केले शीख महिलेवर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 08:51 IST

मुस्लिम कुटुंबीयांच्या या पावलाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. 

ठळक मुद्देएका मुस्लिम कुटुंबीयांनी शीख महिलेवर अंत्यसंस्कार करून एक अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. त्या शीख महिलेच्या मुला-मुलींसह कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता, त्यानंतर शेजारी राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबानं अंत्यविधींसह तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मुला-मुलींना राणी काकीच्या मृत्यू बातमी सांगितली, त्यावेळी त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.

चंदीगडः पंजाबच्या बठिंडामध्ये एका मुस्लिम कुटुंबीयांनी शीख महिलेवर अंत्यसंस्कार करून एक अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. त्या शीख महिलेच्या मुला-मुलींसह कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता, त्यानंतर शेजारी राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबानं अंत्यविधींसह तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मुस्लिम कुटुंबीयांच्या या पावलाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. मलेरकोटला भागात ही घटना घडली असून, महिलेची ओळख दलप्रीत कौर या नावानं झाली आहे. ती घरगुती कामं करायची. गेल्या काही दिवसांपूर्वी ती तीर्थयात्रेला गेली होती, तेव्हा ती आजारी पडली. सोमवारी तिचा मृत्यू झाला. दलप्रीत कौरचे अंतिम संस्कार करणाऱ्या कुटुंबीयांमधले मोहम्मद अस्लम म्हणाले, आम्ही त्यांना राणी काकी असे संबोधत होतो. त्या एका भाड्याच्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात कोणतीच माहिती नव्हती. त्यांची आई आणि भाऊ कॅनडामध्ये राहतात. त्यांचं सासर हे संगरुर जिल्ह्यातील झुंडा गावात वास्तव्याला असल्याचं सांगितलं जातं. राणी काकीचं माहेर आणि सासर ही दोन्ही कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. अस्लम पुढे सांगतात, राणी काकीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोबाइलवरून आम्हाला त्यांच्या मुला-मुलींचा नंबर मिळाला. त्या दोघांनाही राणी काकीच्या मृत्यू बातमी सांगितली, त्यावेळी त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. मुलाकडून समजलं की राणी काकीचं 1999ला घटस्फोट झाला होता, त्यानंतर ती एकटीच राहत होती. इतक्या वर्षात आम्हाला त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. जेव्हा कुटुंबीयांनी इथे येण्यास नकार दिला, तेव्हा आम्हीच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मुस्लीम कुटुंबीयांनी शीख परंपरेनं राणी काकीवर अंत्यसंस्कार केले आहेत. गुरुद्वारेत आता श्राद्ध आणि इतर विधी केले जाणार असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.