शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'गद्दार' म्हटल्यानं सिद्धू खवळला, पंजाबच्या विधानसभेत 'राडा' झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 15:29 IST

पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सिद्धू यांनी केलेल्या विधानानंतर पंजाब विधानसभेत मोठा गदारोळ झाला.

चंदीगड- पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सिद्धू यांनी केलेल्या विधानानंतर पंजाब विधानसभेत मोठा गदारोळ झाला. पंजाबच्या अकाली दलानं विधानसभेत सिद्धूला खडे बोल सुनावले आहेत. अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया आणि सिद्धू यांच्यात वादविवाद झाले आहेत. सभागृहात मजीठिया यांनी सिद्धूला गद्दार असं संबोधलं आहे, तर सिद्धू यांनी मजीठिया यांना डाकू असं म्हटलं आहे.दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात अपशब्द वापरले. त्यानंतर मोठा गदारोळ झाल्यानं पंजाब विधानसभेच्या अर्थसंकल्पाचं भाषण थांबवण्यात आलं. सिद्धूच्या विरोधात अकाली दल आणि भाजपा नेत्यांनी वॉक आऊट केलं. बिक्रम सिंह मजीठिया यांनी नवज्योत सिंग सिद्धूचे पाकिस्तान दौऱ्यातील पाक आर्मी चिफ जनरल बावजांच्या गळाभेटीचे फोटो दाखवले. तसेच खलिस्तान समर्थक गोपाल चावला यांचे फोटो दाखवले. तसेच पाकिस्तानचे झेंडे जाळण्याचाही प्रयत्न केला आहे. अकाली दलानं सिद्धूवर गंभीर आरोप केले आहेत.अमरिंदर सिंग पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करत असतानाच सिद्धू शांत राहण्याचं आवाहन करत आहे. सिद्धूला भारतापेक्षा इम्रान खान यांची मैत्री महत्त्वाची वाटते. मजीठिया म्हणाले, पूर्ण देशाला माहीत आहे की, पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. जो दहशतवाद्यांचा उपयोग भारताविरोधात कारवाई करण्यासाठी करतो. तरीही नवज्योत सिंग सिद्धू  हे पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याची भाषा करत आहेत. पाकिस्तानचा विरोध करत नाहीत. त्यामुळे पंजाब सरकारनं सिद्धूसंदर्भात स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर पंजाब विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी दिली जाईल. अकाली दलानं सिद्धू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी विरोध प्रदर्शनही केलं आहे.  

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाबpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला