शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगडमध्ये आपकडून भाजपाला धोबीपछाड, महापौरांचा केला दारुण पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 13:30 IST

Chandigarh Municipal Corporation Election Results: - BJPचे वर्चस्व असलेल्या चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला आहे. आज सुरू असलेल्या चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये AAP जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे.

चंदीगड - भाजपाचे वर्चस्व असलेल्या चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला आहे. आज सुरू असलेल्या चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आपनेभाजपाला जोराचा धक्का दिला आहे. पालिकेतील वॉर्ड क्र. १७ मध्ये आम आदमी पक्षाच्या दमनप्रीत यांनी महापौर रविकांत यांना ८२८ मतांनी पराभूत केले. दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या निकालांमध्ये आपच्या उमेदवारांनी भाजपाच्या अनेक विद्यमान नगरसेवकांचा पराभव केला आहे.

आतापर्यंत २६ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये आप ११, काँग्रेस ६, भाजपा ८ आणि अकाली दल एका जागेवर आघाडीवर आहे. यावेळच्या निकालांनी सर्वच राजकीय पंडितांना धक्का दिला आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेस आणि भाजपाला जोरदार टक्कर दिली आहे.

चंदीगड महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी ६० टक्के मतदान झाले होते. येथील प्रभागांची संख्या २०१६ मध्ये २६ होती. तर आता ही संख्या वाढून ३५ करण्यात आली आहे. येथील निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये मुख्य लढत असते. मात्र आता आम आदमी पक्षही मैदानात उतरल्याने लढत तिरंगी झाली आहे.  

टॅग्स :AAPआपBJPभाजपाPoliticsराजकारण