शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत असतानाही सत्ता हातून गेली! चंडीगडमध्ये आपचा भाजपवर निशाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 06:42 IST

Chandigarh Mayor Election 2024: बहुमत असतानाही ८ मते बाद ठरविल्याने  काँग्रेस-आम आदमी पार्टी (आप) आघाडीचा पराभव करून भाजपने चंडीगड महानगरपालिका ताब्यात घेतली आहे. महापौर, वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौर या तिन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

- बलवंत तक्षकचंडीगड : बहुमत असतानाही ८ मते बाद ठरविल्याने  काँग्रेस-आम आदमी पार्टी (आप) आघाडीचा पराभव करून भाजपने चंडीगड महानगरपालिका ताब्यात घेतली आहे. महापौर, वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौर या तिन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करीत आप,  काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. पीठासीन अधिकाऱ्यांवर कारवाई करून निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीचे समीकरण आप व काँग्रेसच्या बाजूने होते. दोन्ही पक्षांचे २० नगरसेवक असून, अकाली दलाचाही १ नगरसेवक आहे. तर भाजपचे १५ नगरसेवक आहेत. 

नेमके काय झाले? बाद ठरलेली मते उमेदवारांच्या प्रतिनिधींना न दाखवता निवडणूक निर्णय अधिकारी निघून गेले. याला काँग्रेस-आप आघाडीचे उमेदवार व नेत्यांनी आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची ही कृती निवडणूक नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला.

मतपत्रिका फाडल्याभाजप नगरसेवक आणि  अधिकाऱ्यांनी काँग्रेस-आपच्या प्रतिनिधींना मतपत्रिकांची छाननी करू दिली नाही. भाजप सदस्य टेबलकडे धावले व तेथील मतपत्रिका त्यांनी फाडून टाकल्या, असा आरोप काँग्रेसने केला.

‘ते’ कोणत्याही थराला जाऊ शकतात : केजरीवालचंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने अप्रामाणिकपणा करण्यात आला तो अत्यंत चिंताजनक आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. जे महापौरपदाच्या निवडणुकीत एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतात, ते देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या थराला जाऊ शकतात, हे सहज लक्षात येते, असा घणाघातही त्यांनी केला.

काळा दिवस : मानहा दिवस देशाच्या इतिहासात काळा दिवस म्हणून स्मरणात राहील. ही फसवणूक लोकसभेत होऊ शकते, अशी भिती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्यक्त केली.

हा देशद्रोह : चढ्ढाआप नेते राघव चढ्ढा यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही प्रक्रिया केवळ ‘घटनाबाह्य आणि बेकायदा’ नाही, तर देशद्रोहाची कृतीदेखील आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस