शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

चंदन गुप्ता हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक, दोघांचा शोध सुरू; तणाव कायम, सुरक्षेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 02:00 IST

कासगंजमध्ये झालेल्या चंदन गुप्ता (२२) या महाविद्यालयीन युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम याला बुधवारी अटक करण्यात आली. सलीमचे वय ३० च्या आत असून त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम हेदेखील या खून प्रकरणात आरोपी आहेत. ते दोघेही फरार आहेत. गुप्ताच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता.

लखनौ : कासगंजमध्ये झालेल्या चंदन गुप्ता (२२) या महाविद्यालयीन युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम याला बुधवारी अटक करण्यात आली. सलीमचे वय ३० च्या आत असून त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम हेदेखील या खून प्रकरणात आरोपी आहेत. ते दोघेही फरार आहेत. गुप्ताच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता.गुप्ता याच्यावर गोळी झाडल्याची कबुली सलीमने दिल्याचा दावा पोलिसांनी केला. कासगंजच्या काही भागांत अजूनही तणाव आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या हेतुने युवकांनी मोटारसायकल फेरी काढली होती. या फेरीवर झालेल्या दगडफेकीनंतर दोन गटांत चकमक उडाली. यात बंदुकीची गोळी लागून चंदन गुप्ता याचा मृत्यू झाला. तीन दुकाने, दोन बसगाड्या व कार पेटवून दिली गेली. हिंसाचार प्रकरणी १५० जणांना अटक करण्यात आली. कासगंजच्या संवदेनशील भागांत सुरक्षा कर्मचाºयांची गस्त वाढवण्यात आली आहे. कासगंजमध्ये मंगळवारी हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडले तरी बुधवारी एकूण परिस्थिती शांततेची आहे. घडलेला हिंसाचार आणि त्याला आवर घालण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांबद्दल केंद्र सरकारने मागवलेला अहवाल राज्य सरकार तयार करीत आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचा तपशीलही केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला जाईल, असे अधिकारी म्हणाला.पहिला गोळीबार रॅलीतून?त्या रॅलीत सहभागी झालेल्या काही युवकांनी मुस्लीम वस्तीत येताच गोळ्या झाडल्याचे चित्रिकरण समोर आले असून, पोलीस ते तपासत आहेत. तहसील कार्यालयावरून हे चित्रिकरण केले गेले आहे. त्या रॅलीत सहभागी झालेल्या काही तरुणांच्या हातात लाठ्या व दंडुके असल्याचेही चित्रित झाले आहे. (वृत्तसंस्था)काँग्रेसच्या शिष्टमंडळाला अडविलेआरोपींच्या घरांवर मालमत्ता जप्त करण्याच्या चिकटवण्यात आल्या आहेत. कासगंज जिल्ह्याच्या सीमेवरील इटा जिल्ह्याच्यामधील मिरहाची भागात प्रवेश करण्यापासून काँग्रेसच्या शिष्टमंडळाला अडवण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून तणावग्रस्त भागांत जाण्यापासून शिष्टमंडळाला रोखल्याचे सूत्रांनी सांगितले. कासगंजचे जिल्हादंडाधिकारी आर. पी. सिंह यांनी या शिष्टमंडळाला ते तणावग्रस्त भागात गेल्यास आणखी प्रश्न निर्माण होतील, या कारणास्तव परवानगी नाकारली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश