जोशीमठ दुर्घटनेत सीमाभागाला जोडणारा पूल वाहून गेला; २०० जवान घटनास्थळी रवाना

By देवेश फडके | Published: February 7, 2021 03:56 PM2021-02-07T15:56:25+5:302021-02-07T15:59:00+5:30

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी गावात असलेल्या जोशीमठ परिसरात आज (रविवार) हिमकडा कोसळून मोठी हानी झाल्याची माहिती आहे. हिमकडा कोसळल्यामुळे जोशीमठ धरण आणि ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे.

chamoli bridge connecting the border in malari area swept away swept away in glacier breakdown | जोशीमठ दुर्घटनेत सीमाभागाला जोडणारा पूल वाहून गेला; २०० जवान घटनास्थळी रवाना

जोशीमठ दुर्घटनेत सीमाभागाला जोडणारा पूल वाहून गेला; २०० जवान घटनास्थळी रवाना

Next
ठळक मुद्देउत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळलासीमाभागाशी जोडणारा मलारी येथील पूल वाहून गेलाआयटीबीपीचे २०० जवान जोशीमठ परिसरात रवाना

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी गावात असलेल्या जोशीमठ परिसरात आज (रविवार) हिमकडा कोसळून मोठी हानी झाल्याची माहिती आहे. हिमकडा कोसळल्यामुळे जोशीमठ धरण आणि ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे भारतीय लष्कराला सीमाभागाशी जोडणारा धौलीगंगेवरील पूलही या दुर्घटनेत वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. (Glacier Breakdown Chamoli Bridge Swept Away At Malari Area)

सीमाभागातील मलारीला जोडणारा पूल हिमकडा कोसळल्याने वाहून गेला आहे. हा पूल लष्काराला सीमाभागांशी जोडतो. पूल वाहून गेल्याचे वृत्त समजताच लष्कराकडून आयटीबीपीच्या २०० जवानांना जोशीमठ परिसरात पाठवण्यात आले आहे. आटीबीपीची एक टीम घटनास्थळाकडे रवाना झाली असून, पूल बांधणारे लष्कराचे एक पथकही जोशीमठ परिसरात पाठवण्यात आले आहे, असे समजते.

महाभयंकर! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळतानाची भयावह दृश्य पाहा

उत्तराखंडमधील रैनी, अलकनंदा या परिसरात मोठा हाहाकार उडाला आहे. नंदादेवी ग्लेशियरचा कडा कोसळल्याने धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांना मोठा पूर आला. पाण्याच्या तडाख्यात ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर दोन पूलही वाहून गेले आहेत. यामध्ये लष्कराला सीमाभागाशी जोडणाऱ्या पुलाचा समावेश आहे. 

सुमारे १०० ते १५० कामगार बेपत्ता

उत्तराखंडमध्ये झालेल्या नैसर्गिक प्रकोपात खूप मोठे नुकसान आणि जीवीतहानी झाल्याची माहिती समोर येत आहे. हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत जोशीमठ येथील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले असून, या प्रकल्पासाठी काम करत असलेले सुमारे १०० ते १५० कामगार बेपत्ता झाल्याची भीती उत्तराखंडचे मुख्यसचिव ओम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे.

हेल्पलाइन क्रमांक जारी

उत्तराखंडमधील दुर्घटनेनंतर उत्तराखंड सरकारने तात्काळ हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. 1070 आणि 9557444486 असे दोन हेल्पलाइन क्रमांक आहेत. तसेच या दुर्घघटनेमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी 9557444486 हा हेल्पालाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात धौलीगंगा या नदीत मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आला. या पुरात किनारी भागातील गावांना मोठा फटका बसला असून, अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेची दखल घेतली असून, आवश्यक अशी सर्व मदत केंद्र सरकार करणार असल्याचे सांगितले आहे. 

Web Title: chamoli bridge connecting the border in malari area swept away swept away in glacier breakdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.