चामलिंग पाचव्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री

By Admin | Updated: May 22, 2014 02:36 IST2014-05-22T02:36:54+5:302014-05-22T02:36:54+5:30

चामलिंग यांनी बुधवारी सलग पाचव्यांदा शपथ घेतली़ येथील राजभवनात राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी चामलिंग व त्यांच्या मंत्रिमंडळातील ११ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली़

Chamling Fifth Chief of the Sikkim CM | चामलिंग पाचव्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री

चामलिंग पाचव्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री

गंगटोक : सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून पवन चामलिंग यांनी बुधवारी सलग पाचव्यांदा शपथ घेतली़ येथील राजभवनात राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी चामलिंग व त्यांच्या मंत्रिमंडळातील ११ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली़ चामलिंग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम डेमोक्रॅटिक पार्टीला (एसडीएफ) ३२ सदस्यीय राज्य विधानसभेत २२ जागांवर विजय मिळाला आहे़ काल मंगळवारी चामलिंग यांना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून नियुक्त करण्यात आले होते़ त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते़ ६३ वर्षीय चामलिंग १९९४ पासून सिक्कीमच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ आहेत़ पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे नेते ज्योती बसू यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द सर्वात मोठी आहे़ ते १९७७ ते २००० पर्यंत प़ बंगालचे मुख्यमंत्री होते़ चामलिंग हे बसू यांचा हा विक्रम मोडीत काढण्याच्या मार्गावर आहेत़ (वृत्तसंस्था)

Web Title: Chamling Fifth Chief of the Sikkim CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.