उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की पर्यटनाचा प्लॅन आखला जात असतो. कुटुंबासह सहलीचं नियोजन करत देवदर्शन आणि पर्यटन दोन्ही आनंद घेण्यात येतो. त्यामुळे, टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीकडूनही अनेक यात्रांचं आयोजन करण्यात येतं. तर, रेल्वे विभागाकडून विशेष ट्रेन सोडण्यात येतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांना सोयीचं पर्यटन करता यावं, यासाठी रेल्वे विभागही तत्पर असतो. आता, रेल्वे विभागाने वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना सोयीचं पर्यटन घडवलं आहे. आयआरसीटीसीने ८ दिवासांचे वैष्णो देवी पॅकेज आणलं आहे.
रेल्वेच्या या पॅकेजमध्ये माता वैष्णो देवीसह हरिद्वार, ऋषिकेश, मथुरा पर्यटनाचाही लाभ मिळू शकतो. आता, या संपूर्ण पॅकेजची माहिती घेऊया.
पॅकेजचे नाव - माता वैष्णो देवी आणि हरद्वीर ऋषिकेश - Mata Vaishno devi With Haridwar-Rishikesh
पॅकेजचा कालावधी- ८ रात्री व ९ दिवसट्रॅव्हल मोड- रेल्वेडेस्टिनेशन कव्हर्ड- हरिद्वार, ऋषिकेश, मथुरा, वृंदावन, कतरा
या सुविधा मिळतील
१. थांबवण्यासाठी हॉटेलची सुविधा मिळेल, नॉर्मल किंवा डिलक्स हॉटेल आहेत, ज्यांना तुमच्या हिशोबानुसार निवड करता येईल.
२. सकाळचा नाष्ता, जेवण आणि रात्रीचे डिनरही मिळणार आहे.
३. पर्यटन क्षेत्रात फिरण्यासाठी एसी बसही मिळेल.
४. प्रवासी विम्याचाही लाभ घेता येईल.
किती असेल तिकीट खर्च
इकॉनॉमी- जर तुम्ही या ट्रिपवर दोन किंवा तीन जणांसह प्रवास करत असाल तर १५,४३५ रुपये खर्च येईल.
स्टँडर्ड- यामध्ये २४,७३५ रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे.
कम्फर्ट- यामध्ये तुम्हाला ३२,४८० रुपये द्यावे लागतील
दरम्यान, आयआरटीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. आयआरटीसीच्या वेबसाईटवरुन तुम्हाला याचं बुकींग करता येईल. तसेच, रेल्वेच्या पर्यटक विभागात जाऊनही तुम्ही बुकींग करू शकता. महाराष्ट्रात वर्धा आणि नागपूर येथून ही ट्रेन सुटणार आहे.