शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

आर्थिक आधारावरील आरक्षणाला आव्हान; सुप्रीम कोर्टाचा निर्णय राखून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 07:02 IST

ॲटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांनी घटना दुरुस्तीचा जोरदार बचाव केला.

नवी दिल्ली : शिक्षण संस्थांतील प्रवेश व शासकीय नोकऱ्यांत आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण देणाऱ्या १०३ व्या घटना दुरुस्तीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील आपला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.  

सरन्यायाधीश यु. यु. लळित यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल आणि साॅलिसीटर जनरल तुषार मेहता यांच्यासह अन्य वरिष्ठ विधिज्ज्ञांचा युक्तिवाद ऐकून घेतला व ईडब्ल्यूएस आरक्षणाने घटनेच्या मूळ रचनेचे उल्लंघन केले किंवा नाही या कायदेशीर मुद्द्यावरील आपला निर्णय राखून ठेवला. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात साडेसहा दिवस सुनावणी चालली. घटनापीठात न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती एस. रविंद्र भट, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी व न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांचा समावेश आहे. 

या आरक्षणाने (ईडब्ल्यूएस) अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गांतील गरिबांना बाजूला लोटले तसेच क्रिमीलेअरची संकल्पनाही मोडीत काढली, असा युक्तिवाद तज्ज्ञांनी केला होता.  विशिष्ट वार्षिक उत्पन्नाहून अधिक उत्पन्न असणाऱ्या लोकांची (क्रिमीलेअर) अपत्ये इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी (ओबीसी) पात्र ठरत नाहीत.  

आरक्षणाची संकल्पना नष्ट करण्याचा प्रयत्नईडब्ल्यूएस  आरक्षणासाठी घटनेत करण्यात आलेल्या दुरुस्तीचे कपटी, आरक्षणाची संकल्पना नष्ट करण्यासाठी मागच्या दाराने केलेला प्रयत्न, असे वर्णन शिक्षणतज्ज्ञ मोहन गोपाल यांनी केले होते.सरकारकडून बचावदुसरीकडे ॲटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांनी घटना दुरुस्तीचा जोरदार बचाव केला. या अंतर्गत देण्यात आलेले आरक्षण वेगळे आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी ५० टक्के आरक्षण मर्यादेला धक्का न लावता ते दिले गेले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षण