बारामतीच्या गडातच पवारांसमोर आव्हान
By Admin | Updated: September 18, 2014 12:59 IST2014-09-18T00:19:13+5:302014-09-18T12:59:38+5:30
विकासकामांचा डोलारा करूनदेखील बारामती विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या निवडणुकीत अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
बारामतीच्या गडातच पवारांसमोर आव्हान
पुणो : विकासकामांचा डोलारा करूनदेखील बारामती विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या निवडणुकीत अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्याच बरोबर अजित पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मोठा गट भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला बारामती तालुक्यात भगदाड पडणार आहे.
बारामती शहरातील नागरी प्रश्न गंभीर आहेत, बारामती पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर निवडूण आलेल्या नगरसेवकांना विचारात न घेता कामे करण्यात आली. त्याच बरोबर ज्या भागात नागरी वस्त्या आहेत. तेथील कामे करण्यात आली नाहीत. त्यामुळे दोन ते अडीच वर्षानंतर देखील हद्दीत आलेल्या भागाचा विकास अर्धवट राहीला आहे. बारामती शहरात गरज नसताना कोटय़वधी रूपयांचा निधी खर्च केला आहे; तर ज्या भागात विकास कामांची गरज आहे. त्या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. या बाबत पदाधिका:यांच्या तक्रारी नगरसेवकांनी अजित पवार यांच्याकडे केल्यानंतर त्या ुनगरसेवकांचाच पाणउतारा अधिका:यांसमोर करण्याचा प्रकार केला जातो, त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती आदी संस्थांवर कार्यरत असलेल्या पदाधिका:यांना निर्णय घेण्याची मुभा नसते. नगरसेवक असो अथवा पंचायत समिती सदस्य असो, त्याची देखील तिच अवस्था आहे. त्यामुळे पक्षांतर्गत पदाधिका:यांना ‘तोंड दाबून बुक्कयांचा मार’ सहन करावा लागत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणपती मंडळांना भेटी असो अथवा छोटे मोठे कार्यक्रम असो, त्यासाठी हजेरी लावण्याचे काम आता अजित पवार यांच्या प}ी सुनेत्र पवार यांनी सुरू केले आहे. प्रभाग निहाय बैठकांमध्ये तरूण कार्यकर्ते थेट विचारणा करीत आहेत. याच पाश्र्वभूमीवर धनगर समाजाने बारामतीत अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी आंदोलन केले. तब्बल 9 दिवस काही कार्यकत्र्यानी उपोषण केले. परंतू किमान सहानुभूती म्हणून तरी धनगर समाजाच्या या आंदोलनाच्या दरम्यान अजित पवार यांनी यावे, अशी कार्यकत्र्याची भूमिका होती. परंतू धनगर समाजाच्या या आरक्षण आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याचा फटका विधानसभा निवडणूकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अजित पवार यांच्या मनमानीला कंटाळून बारामती तालुक्यातील आजी, माजी पदाधिकारी, विशेषत: बागायती भागातील वजनदार मंडळी भाजपाच्या संपर्कात आहेत. मोठा गट राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर यदाकदाचित कॉँग्रेसने राष्ट्रवादी कॉँग्रेस बरोबर आघाडी न केल्यास कॉँग्रेसने देखील बारामतीची जागा लढविण्याची तयारी केली आहे.
कॉँग्रेसच्या वतीने पक्षाच्या सायबर सेलचे प्रमुख आणि
बारामती शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष अॅड. रविंद्र रणसिंग यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय
घेतला आहे. (प्रतिनिधी)
4बारामती तालुक्यात सर्व संस्थांवर निरंकूश सत्ता असताना मागील काही वर्षात सामान्य लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. कोटय़वधी रूपयांचा निधी बारामतीसाठी उपलब्ध झाला. सरकारी कार्यालयांच्या इमारती उभ्या राहील्या. परंतू बारामतीच्या सामान्या नागरीकांच्या उत्पन्नात भर पडली नाही, अशी मानसिकता अनेकांची झाली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती तालुक्यातील पाणी प्रश्न, दुहेरी टोल आकारणी, स्थानिक बेरोजगारी, एमआयडीसीतील ठेकेदारीमुळे मेटाकूटीस आलेला बारामतीतील तरूणांची नाराजी दिसून आली. त्यामुळे बारामती तालुक्यातील जिरायती भागाचा पाणी प्रश्न विधान सभा निवडणूकीपूर्वी सोडविण्यासाठी अटोकाट प्रय} केले. त्यासाठी युद्धपातळीवर काम केले. कोटय़वधी रूपयांचा निधी वापरण्यास आला. 22 गावात पाणी प्रश्न आहे. परंतु पाणी प्रश्न सुटला फक्त 4 गावे आणि त्याच्या आसपासच्या काही वाडय़ा वस्त्यांसाठी त्याचा फायदा होणार आहे. या भागातील पाझर तलाव भरण्यार्पयत योजना अंमलात आणली आहे. त्यासाठी येणारा वीज बिलाचा प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे.
4बारामती तालुक्यातील सिंचनाचा अनुषेश, दुष्काळग्रस्त गावांचा पाणी प्रश्न, टोलधाड, एमआयडीसीतील कामगारांची होत असलेली पिळवणूक, कंत्रटी पद्धतीच्या कामगारांची अवहेलना, धनगर आरक्षणाच्या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष, तालुक्यातील विकास कामांवर नियमबा झालेला जादा खर्च, तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्यावरील कर्जाचा डोंगर आदी प्रश्नांनी या निवडणूकीत डोके वर काढले आहे; त्याचा त्रस अजित पवार यांना निवडणूक प्रचाराच्य काळात चांगलाच होणार असल्याचे चित्र आहे.