भूजमध्ये काँग्रेससमोर आव्हान, देशातील सर्वांत मोठ्या जिल्ह्यात भाजपाचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:46 AM2017-11-23T04:46:10+5:302017-11-23T04:46:43+5:30

भूज : देशातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या भूजमध्ये (गुजरात) भाजपची स्थिती आधीपासून चांगली दिसत आहे.

Challenge to Congress in Bhuj, BJP's domination in the largest district of the country | भूजमध्ये काँग्रेससमोर आव्हान, देशातील सर्वांत मोठ्या जिल्ह्यात भाजपाचा दबदबा

भूजमध्ये काँग्रेससमोर आव्हान, देशातील सर्वांत मोठ्या जिल्ह्यात भाजपाचा दबदबा

Next

- विकास मिश्र
भूज : देशातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या भूजमध्ये (गुजरात) भाजपची स्थिती आधीपासून चांगली दिसत आहे. तथापि, काँग्रेससाठी आव्हानांचा मुकाबला करणे म्हणावे, तेवढे सोपे दिसत नाही. भूज जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत पाटीदार समुदायाचे संख्यात्मकदृष्ट्या वर्चस्व आहे. तथापि, पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांचा प्रभाव जाणवत नाही. २०१२ च्या निवडणुकीत भाजपने या जिल्ह्यातील ६ पैकी विधानसभेच्या ५ जागा जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे आजवर पार पडलेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकता आलेल्या नाहीत.
स्थिती काय आहे?
भूज जिल्ह्यातील अबदासा या विधानसभा मतदारसंघातून मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे राष्टÑीय प्रवक्ते शक्तिसिंह गोहील विजयी झाले होते. यावेळी मात्र ते मांडवी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उभे ठाकले आहेत. अबदासा मतदारसंघातून सलग दोनदा कोणीही जिंकून आलेले नाही. त्यामुळे गोहील यांनी यावेळी मांडवी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. याच मतदारसंघातून भाजपने छबी पटेल यांना उमेदवारी देत त्या हमखास विजयी होतील, यादृष्टीने चोख व्यवस्थाही केली आहे. यासाठी नखतराणामधील काही भाग अबदासा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला आहे. आधी नखतराणामधील काही भाग भूज आणि मांडवी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट होता. नखतराणा क्षेत्रात पाटीदार समुदायाचा बोलबाला आहे. पाटीदार समुदायाची मते छबी पटेल यांनाच मिळतील, अशी भाजपला आशा आहे.
छबी पटेल हे मागील दोन वर्षांपासून सक्रिय आहेत. हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाचाही या मतदारसंघात फारसा प्रभाव दिसत नाही. येथील पाटीदार समुदाय संपन्न असून, बव्हंशी कुटुंबांतील लोक नागपूर, नाशिक आणि पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी येथे येऊन मतदान करावे, यासाठी छबी पटेल हे प्रयत्न करतील.
या विधानसभा मतदारसंघातील २४ गावांत कडवा आणि लेवा पाटील समुदायाचे वर्चस्व आहे. लेवा पटेल समुदायातील अनेक कुटुंबे एनआरआय असल्याने त्यांना आरक्षणाबाबत फारसे स्वारस्य नाही. पटेल समुदायात काही मुद्यांवर मतभेद असले तरी हिंदुत्वाच्या मुद्यावर पटेल समुदाय एकजूट होतो. या गावांत निमाबेन यांना चांगला प्रतिसाद मिळेल. शहरी भागात थोडासा विरोध असला तरी हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांना चांगला फायदा मिळेल.
>सामाजिक धुव्रीकरण
भूज विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा निमाबेन आचार्य यांना उमेदवारी दिली आहे. तथापि, विद्यमान आमदाराविरुद्ध नाराजीची चर्चा ऐकण्यात येते. असे असले तरी निमाबेन यांचा विजय पक्का मानला जातो.
काँग्रेसने मुस्लीम समाजाचे आदम चाकी यांंना भाजपा उमेदवाराविरुद्ध मैदानात उतरविले आहे. निमाबेन यांच्यावर नाराज असलेले लोक भाजपलाच मते देतील, असे या ठिकाणी जबरदस्त सामाजिक धुव्रीकरण झालेले दिसते.

Web Title: Challenge to Congress in Bhuj, BJP's domination in the largest district of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.