चंद्रपूर जिल्हा दारुबंदीला हायकोर्टात आव्हान
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:36+5:302015-01-29T23:17:36+5:30
चंद्रपूर जिल्हा दारुबंदीला हायकोर्टात आव्हान

चंद्रपूर जिल्हा दारुबंदीला हायकोर्टात आव्हान
च द्रपूर जिल्हा दारुबंदीला हायकोर्टात आव्हाननागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या संस्थापक-अध्यक्ष ॲड. हर्षल चिपळूणकर यांनी या निर्णयाविरुद्ध रिट याचिका दाखल केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू झाल्यास बार, वाईनशॉप व रेस्टॉरंटमध्ये काम करणारे सुमारे १० हजार महिला व पुरुष कामगार बेरोजगार होतील. यापैकी अनेकांनी घर, लग्न, मुलांचे शिक्षण इत्यादीसाठी कर्ज घेतले आहे. प्रत्येकाच्या कुटुंबात ४-५ सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. याचिका ४ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी येणार आहे.