दोन ठि काणी तरुणावर चाकूहल्ला
By Admin | Updated: January 8, 2016 02:14 IST2016-01-08T02:14:01+5:302016-01-08T02:14:01+5:30
औरंगाबाद : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर ओळखीच्याच दोन जणांनी भांडण उकरून काढून चाकूहल्ला केला. ही घटना रोशनगेट परिसरातील मदनी चौक येथे ५जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

दोन ठि काणी तरुणावर चाकूहल्ला
औ ंगाबाद : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर ओळखीच्याच दोन जणांनी भांडण उकरून काढून चाकूहल्ला केला. ही घटना रोशनगेट परिसरातील मदनी चौक येथे ५जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. शेख इस्माईल शेख इब्राहिम (३२,रा.बाबर कॉलनी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी सांगितले की. शेख इस्माईल हे ५ जानेवारी रोजी मदनी चौक येथे मित्रासोबत गप्पा मारत होते. याप्रसंगी त्यांच्या ओळखीतील आरोपी बखर आणि अन्य एक जण तेथे आला. यावेळी त्यांनी तू येथे काय करतो, असे विचारत शिवीगाळ करीत भांडण करण्यास सुरुवात केली. यावेळी बखरने धारदार चाकूने इस्माईलवर चाकूने हल्ला केला. या घटनेत इस्माईल जबर जखमी झाला. याप्रकरणी आरोपीविरोधात जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.अन्य एका घटनेत मोगलपुरा येथील १६ वर्षीय युवकावर दोन जणांनी पतंग उडविण्याच्या कारणावरून चाकूहल्ला केला. ही घटना ५ जानेेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर घडली. किरण आणि मायकल (पूर्ण नाव आणि पत्ता नाही)असे आरोपींची नावे आहेत. तरुण हा पतंग उडवीत असताना आरोपींनी त्यास ढकलून दिले. याप्रसंगी त्यांच्यात जोरदार वाद झाला. वादानंतर आरोपींनी तरुणावर चाकूने वार केले. छावणी ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.अश्लील मेसेज पाठवून विनयभंगऔरंगाबाद : पुंडलिकनगर येथील रहिवासी महिलेच्या मोबाईलवर आठ दिवस अश्लील मेसेज पाठवून आणि फोन करून तिला त्रास दिल्याप्रकरणी एका ट्रॅव्हल्सच्या चालकाविरोधात क्र्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा एका ट्रॅव्हल्स कंपनीत चालक पदावर कार्यरत आहे. गारखेडा परिसरातील पुंडलिकनगर येथील महिलेचा क्रमांक मिळवून २८ डिसेंबरपासून ते ५ जानेवारीपर्यंत तो तिला त्रास देत होता. सहायक पोलीस निरीक्षक मिसाळ या घटनेचा तपास करीत आहेत.