कांदिवलीत तरुणीवर चाकूहल्ला
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:09+5:302015-08-20T22:10:09+5:30
कांदिवलीत तरुणीवर चाकूहल्ला

कांदिवलीत तरुणीवर चाकूहल्ला
क ंदिवलीत तरुणीवर चाकूहल्लाहल्ला करुन तरुण पसारतरुणीची तब्येत गंभीरमुंबई: कांदिवली पूर्व परिसरात नरसीपाडा येथील संत रोहिदास चाळीमध्ये कैलाश पवार (२३) नावाच्या इसमाने त्याच परिसरात राहणार्या वनिता अहिरे (१९) या तरुणीवर चाकूहल्ला केला आणि नंतर तो पसार झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. त्याने विनिताच्या पाठ, पोट, छाती आणि मानेवर एकूण पाच वर केले. ज्यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. वनिताला कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरात असलेल्या डीएनए रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती फारच गंभीर बनल्याचे समतानगर पोलिसांनी सांगितले. मात्र त्याने हा हल्ला का केला? याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. तिच्या घरच्यांसोबत पवारचे काही वाद होते. त्यादृष्टिनेही पोलीस सर्व बाबी पडताळून पाहत आहेत. फरार झालेल्या पवारचा देखील शोध सुरु आहे. (प्रतिनिधी)