शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर चाको काँग्रेसबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 02:23 IST

केरळ विधानसभा; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून, यामुळे राज्यात त्यांनी काँग्रेसच्या अडचणी वाढविल्या आहेत. तथापि, पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या जाण्याने फार काही फरक पडणार नाही. कारण त्यांना फार जनाधार प्राप्त नाही. ते केवळ ख्रिश्चन समुदायाच्या एका गटाचे नेतृत्व करतात.

उच्चपदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाको हे काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. केरळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची डाव्या पक्षांसमवेत आघाडी आहे. शरद पवार व चाको यांच्यात तीन दशकांहून अधिक जुने संबंध आहेत. पवार यांनी काँग्रेस सोडून काँग्रेस एसची स्थापना केली होती, तेव्हा त्यांनी चाको यांना केरळ प्रदेशाध्यक्ष केले होते.चाको यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्यापूर्वी गंभीर आरोप केले आहेत. पक्षात गटबाजी वाढली आहे. ओमन चंडी व रमेश चन्नेथिला यांनी आपापले गट बनवून पक्षावर नियंत्रण मिळवले आहे. सोनिया गांधी यांना त्यांनी राजीनामा पाठवला असला, तरी त्यांनी तो अद्याप स्वीकारलेला नाही.पक्षाच्या सुत्रांचे म्हणणे आहे की, चाको त्यांच्या समर्थकांना तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, चंडी व चेन्नेथिला यांच्या गटाचा याला विरोध होता. पक्षात वेगळे पडलेले चाको उपेक्षेला वैतागले तेव्हा त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

भाजपमध्ये जाण्याचे फेटाळले वृत्तnचाको यांच्यासारख्या ख्रिश्चन चेहऱ्याला आपल्या पक्षात सहभागी करून घेण्यासाठी भाजपचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असे समजते. परंतु, चाको यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१