चाचा चौधरी व साबूचा ‘प्राण’ हरवला
By Admin | Updated: August 7, 2014 00:37 IST2014-08-07T00:37:35+5:302014-08-07T00:37:35+5:30
चाचा चौधरी व साबू या दोन सजीव पात्रंच्या निर्मितीमागचा प्राण असलेले व्यंगचित्रकार, प्राणकुमार शर्मा यांचे आज सकाळी गुडगावच्या एका रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले.

चाचा चौधरी व साबूचा ‘प्राण’ हरवला
>नवी दिल्ली : लहान मुलांच्या भावविश्वाला समृद्ध करणा:या चाचा चौधरी व साबू या दोन सजीव पात्रंच्या निर्मितीमागचा प्राण असलेले व्यंगचित्रकार, प्राणकुमार शर्मा यांचे आज सकाळी गुडगावच्या एका रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. शर्मा हे प्राण या नावानेच लोकप्रिय होते.
डायमंड कॉमिक्सचे प्रकाशक गुलशन राय यांनी त्यांच्या निधनाची वार्ता देताना, आज सकाळी 9 वाजता मेदांता रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. गेल्या आठ महिन्यांपासून ते आतडय़ांच्या कर्करोगाने पीडित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी आहे. व्यंगचित्रकार प्राण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, टि¦टरवर, प्राण हे बहुआयामी व्यंगचित्रकार असून त्यांनी आपल्या कामाद्वारे लोकांच्या चेह:यावर हास्य फुलविले होते असे म्हटले आहे. प्राण यांचा जन्म 1938 मध्ये पाकिस्तानातील लाहोरजवळच्या कासूर येथे झाला होता. त्यांनी दिल्लीत 196क् मध्ये मिलाप या वृत्तपत्रतून आपल्या व्यंगचित्रकारितेला सुरुवात केली होती. त्यात ते दाबू नावाच्या व्यक्तिरेखेची व्यंगपट्टी बनवीत असत. 1969 मध्ये त्यांनी हिंदी नियतकालिक लोटपोटकरिता चाचा चौधरीची व्यक्तिरेखा साकारली जी पुढे बालमानसात प्रचंड लोकप्रिय झाली. 1981 साली भारतात व्यंगचित्रचे कुठलेही मासिक वा नियतकालिक नव्हते. जी मासिके होती ती परदेशी होती. गेल्या 35 वर्षापासून प्राण यांच्या व्यंगचित्रंना डायमंड कॉमिक्सने प्रसिद्धी देऊन व्यंगचित्रमालिकांच्या मासिकांचे एक नवे जग मुलांसाठी उभे केले असल्याचे राय यांनी पुढे बोलताना म्हटले. प्राण यांनी साकारलेल्या श्रीमतीजी, पिंकी, बिल्लू, रमण व चन्नीचाची सारख्या व्यक्तिरेखा त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात नेहमी राहतील अशीही जोड त्यांनी पुढे दिली. (वृत्तसंस्था)